किमान तापमान : 25.19° से.
कमाल तापमान : 25.72° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 2.21 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.72° से.
24.15°से. - 28.89°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.8°से. - 28.3°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर घनघोर बादल24.7°से. - 28.55°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.02°से. - 28.98°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 29.35°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.29°से. - 29.02°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादलनवी दिल्ली, २२ जून – पंजाबमध्ये पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार शीख असेल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकतेच जाहीर केले. केजरीवाल यांचा इशारा कॉंग्रेसमध्ये नाराज असलेले नवज्योतसिंग सिद्धू यांच्याकडे असल्याचे मानले जात आहे. सिद्धू आपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या शक्यतेचे केजरीवाल यांनी खंडन देखील केलेले नाही.
पंजाबमध्ये पुढच्या वर्षी मार्चमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यातच मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात दररोज संघर्ष उडत आहे. माझ्यासाठी चर्चेचे दरवाजे बंद करणारे अमरिंदरसिंग कोण, असा प्रश्न नवज्योत सिद्धू यांनी उपस्थित केला. पक्षाचे सर्व ७८ आमदार आपल्या पाठीशी असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. अमरिंदरसिंग यांचे कॉंग्रेस पक्षात चांगले वजन असल्याने, आपला टिकाव लागणार नाही, हे सिद्धूंनी चांगलेच ओळखले असून, निवडणुकीच्या तोंडावर ते आपमध्ये जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. २०१७ च्या निवडणुकीपूर्वी सिद्धू यांनी अकाली दलाविरोधात भूमिका घेत भाजपाचा राजीनामा दिला आणि कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हाही ते आपच्या संपर्कात होते.
ज्याच्यावर पंजाबला अभिमान वाटतो, अशी शीख व्यक्ती आपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असेल, असे केजरीवाल यांनी जाहीर केले. त्यामुळे आपचा चेहरा सिद्धू असतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. सिद्धू यांच्याविषयी विचारले असता, ते कॉंग्रेसचे नेते असून, आपण त्यांचा आदर करतो. सिद्धू आपमध्ये येणार असतील, तर त्याची निश्चितपणे माहिती देऊ, असे केजरीवाल म्हणाले.