किमान तापमान : 24.28° से.
कमाल तापमान : 24.86° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 3.72 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.28° से.
23.99°से. - 28.15°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.12°से. - 27.6°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल25.32°से. - 28.13°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल25.39°से. - 28.77°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.4°से. - 28.37°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.85°से. - 28.36°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादलएक हजारावर लोकांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले, मूक-बधिरांना केले जात होते लक्ष्य, आयएसआयकडून मिळायचा निधी,
लखनौ, २१ जून – उत्तरप्रदेशच्या दहशतवादविरोधी पथक अर्थात् एटीएसने देशव्यापी धर्मांतर रॅकेटचा छडा लावत ते उद्ध्वस्त केले असून, हे रॅकेट चालविणार्या दोन मौलवींना आज सोमवारी बेड्या ठोकल्या आहेत. मुफ्ती काझी जहांगिर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम अशी या मौलवींची नावे आहेत. मूक-बधिर लोक विशेषत: लहान मुले त्यांचे लक्ष्य होते. यासाठी दोघांनाही पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात निधी मिळत होता, अशी धक्कादायक माहिती राज्याचे अतिरिक्त महासंचालक प्रशांत कुमार यांनी दिली.
या दोघांनी आतापर्यंत एक हजारावर हिंदू लोकांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले आहे. लहान मुले आणि महिलांना ते आपल्या जाळ्यात ओढत होते. नोएडातील एका मूक-बधिर शाळेतील शंभरावर मुलांना त्यांनी इस्लाम बनविले असल्याचे प्रशात कुमार यांनी या रॅकेटची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.
हे दोघेही दिल्लीच्या जामियानगर भागात वास्तव्यास आहेत. पाकिस्तानात बसलेले त्यांचे म्होरके यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात निधी पुरवायचे. विशेषत: ते आयएसआयच्या संपर्कात राहायचे. २ जून रोजी डासना येथील एका मंदिरात दोघांनी घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. उत्तरप्रदेशात लक्ष्य निर्धारित करून लोकांचे धर्मांतर केले जात असून, यासाठी त्यांना मोठ्या रकमेचे आमीष दाखवले जात असल्याची कबुली त्यांनी दिली. पैशाच्या आमिषाला बळी न पडणार्यांना धमक्या दिल्या जात होत्या, असेही या मौलवींनी सांगितले.
मथुरा, वाराणसीतही रॅकेट सक्रिय
दोन वर्षांपासून हे रॅकेट सक्रिय असून, यात एक मोठी संस्था आणि इतर काही लोकांचाही समावेश आहे. या सर्वांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नोएडा, मथुरा आणि वाराणसीसह अन्य ठिकाणी आमचे रॅकेट सक्रिय आहे. देशातील अन्य भागातही हे रॅकेट चालवले जाते.
मोहम्मदचे कार्यालय सील
एटीएसच्या अधिकार्यांनी मोहम्मद उमरचे दिल्लीतील कार्यालय सील केले आहे. याच कार्यालयातून धर्मांतराचे हे रॅकेट चालविले जात होते. इस्लामिक दावा सेंटर या नावाने त्याने हे कार्यालय सुरू केले होते. एटीएसने या कार्यालयाची झडती घेतली असून, मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह दस्तावेज जप्त केले आहेत.
मोहम्मद उमर नव्हे, श्यामप्रतापसिंह
मोहम्मद उमर हा आधी हिंदू होता. श्यामप्रतापसिंह गौतम असे त्याचे खरे नाव होते. २० वर्षांचा असताना त्याने इस्लाम धर्म स्वीकारला. तेव्हापासून त्याने हिंदूंना मुसलमान बनविण्याची योजना आखण्यास सुरुवात केली होती. १९६४ मध्ये त्याचा हिंदू राजपूत परिवारात जन्म झाला. धनराजसिंह असे त्याच्या वडिलांचे नाव होते. नैनिताल येथे पदव्युत्तर शिक्षण घेत असताना त्याची ओळख नासिर खानसोबत झाली आणि त्याला इस्लाम धर्माविषयी आवड निर्माण झाली. सुरुवातीला नासिर त्याला प्रत्येक मंगळवारी मंदिरातही न्यायचा. चांगली मैत्री झाल्यानंतर नासिरने त्याला इस्लाम धर्माशी संबंधित सर्वच पुस्तके दिली आणि कुराणही दिले. त्यानंतर त्याने धर्म बदलण्याचा निर्णय घेतला होता.