किमान तापमान : 28.22° से.
कमाल तापमान : 29.4° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 39 %
वायू वेग : 2.56 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.4° से.
23.86°से. - 29.99°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.33°से. - 27.74°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल24.61°से. - 28.54°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.91°से. - 28.49°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर कुछ बादल25.02°से. - 28.97°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.45°से. - 28.82°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादलउत्तरप्रदेश, आसाम करणार कायदा,
लखनौ/दिसपूर, २० जून – आगामी काळात उत्तरप्रदेश आणि आसाममध्ये दोन अपत्य असणार्या नागरिकांनाच सरकारी योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. उत्तरप्रदेशच्या राज्य कायदा आयोगाने लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वशर्मा यांनीही राज्य सरकारच्या काही खास सरकारी योजनांचा लाभ केवळ दोन अपत्य असणार्यांचा मिळेल, असे वक्तव्य शनिवारी रात्री केले आहे.
आसाम सरकार यासाठी नीतिबद्ध आणि अनुक्रमिक पद्धतीने कार्य करणार आहे. आसामच्या सर्व योजनांमध्ये प्रस्तावित लोकसंख्या नियंत्रण धोरण त्वरित लागू होणार नाही. अनेक योजना केंद्र सरकातर्फे राबविल्या जातात. त्यामध्ये राज्य हस्तक्षेप करू शकत नाही. परंतु, राज्य सरकारने कोणतीही गृहनिर्माण अथवा शाळा-महाविद्यालये प्रवेशासारख्या योजना लागू केल्यास दोन अपत्यांची अट ठेवली जाईल. त्यानंतर हळूहळू राज्यातील सर्व योजनांसाठी ही अट लागू करण्यात येईल, असे बिस्वशर्मा यांनी म्हटले आहे. उत्तरप्रदेश कायदा आयोग सध्या राजस्थान आणि मध्यप्रदेशसह इतर काही राज्यात लागू असलेल्या कायद्यांसह सामाजिक परिस्थिती आणि इतर मुद्यांचा अभ्यास करीत आहे. लवकरच आयोग अहवाल तयार करुन राज्य सरकारला सादर करेल. मागील चार वर्षांत राज्यात लव्ह-जिहादविरोधी कायदा आणि सार्वजनिक व खाजगी मालमत्ता नुकसान वसुली कायदा यासारखे अनेक नवीन कायदे लागू करण्यात आले आहेत.
शासकीय कर्मचार्यांना वीज देयक भरल्यानंतरच पगार
आसाममध्ये आता शासकीय कर्मचार्यांना वीज देयक भरल्यानंतरच पगार मिळणार आहे. मुख्यमंत्री बिस्वशर्मा यांनी नवीन धोरण लागू केले आहे. हा नियम राज्यातील सर्व सरकारी कर्मचार्यांना लागू असेल आणि पगार मिळण्यासाठी वीजदेयक वेळेवरच भरावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आसामच्या वीज वितरण कंपनीने यासंदर्भात अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, आयुक्त आणि सर्व सरकारी विभागांच्या सचिवांना पत्र पाठविले आहे. महिनाअखेरीस पगार घेण्यापूर्वी कर्मचार्यांना वीजबिल सादर करावे लागणार आहे.