किमान तापमान : 24.99° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
24.11°से. - 25.77°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल१२ जणांना अटक; शस्त्र व स्फोटकांचा साठा जप्त,
श्रीनगर, १९ जून – जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत मादकपदार्थांचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाळे उद्ध्वस्त केले असून, शस्त्र आणि स्फोटकांच्या मोठ्या साठ्यासह १२ जणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून २१ लाख रुपयांची रोखही जप्त करण्यात आली आहे. कारवाईत जप्त केलेल्या हेरॉईनचे मूल्य ४५ कोटी रुपये आहे.
या रॅकेटवर गुप्तचर यंत्रणांची मागील काही दिवसांपासून बारीक नजर होती. तशा सूचनाही जवान व पोलिसांना सातत्याने दिल्या जात होत्या. या रॅकेटमधील सर्व सदस्यांची ओळख निश्चित केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या हालचाली टिपण्यास सुरुवात केली. बारामुल्ला राज्य महामार्गावर आज नाकेबंदी करून या सर्वांना अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिस प्रवक्त्याने दिली.
या कारवाईत अटक करण्यात आलेल्या लोकांजवळून हेरॉईनचे ११ पॅकेट, एके रायफल्स, चार चिनी पिस्तूल, मोठ्या प्रमाणात काडतुसे, १० चिनी हातबॉम्ब आणि २१ लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली, असे प्रवक्ता म्हणाला. तीन वाहनांमधून हे लोक प्रवास करीत होते. ही सर्व वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. या सर्वांचे सीमेपलीकडे सक्रिय असलेल्या अतिरेकी गटांशी जवळचे संबंध असून, काश्मीर खोर्यात सक्रिय असलेल्या अतिरेक्यांना मादकपदार्थ आणि शस्त्रांचा पुरवठा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती, असे प्रवक्त्याने सांगितले.