किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलतरंगणारी पेटी, रडण्याचा आवाज आणि नावाडी चकित,
गाझिपूर, १७ जून – उत्तरप्रदेशच्या गाझिपूर जिल्ह्यातील गंगा नदीच्या किनार्यावर आपली नाव वल्हवणार्या एका नावाड्याला वाहून येणारी एक पेटी दिसली. त्यात नक्कीच खजिना असावा, या विचारातून मोठ्या कुतुहलाने त्याने ती पेटी बाहेर आणली आणि उघडून पाहताच त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्या पेटीत नवजात बालिका जिवंत अवस्थेत त्याला दिसली…!
या पेटीमध्ये या चिमुकलीसोबतच दुर्गा देवी आणि अन्य काही देवी-देवतांचे फोटोही होते. या मुलीची जन्मपत्रिकाही होती. नावाड्याचे नाव गुल्लू चौधरी आहे. मंगळवारी सायंकाळी त्याला नदीच्या किनार्यावर ही लाकडी पेटी आढळली. त्या पेटीतून रडण्याचा आवाज येत होता. घाटावर उपस्थित काही लोकही जमले. त्यांनी पेटी उघडली तेव्हा लोक चकित झाले. यात एका ओढणीमध्ये ही चिमुकली मुलगी गुंडाळलेली आढळली. लोकांनी लगेच पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी या नवजात मुलीला आशा ज्योती केंद्रात पोहोचविले.
सरकार करणार गंगेचे पालनपोषण
या घटनेची माहिती मिळताच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गाझिपूरच्या जिल्हा दंडाधिकार्यांना, नवजात मुलीला चिल्ड्रेन होममध्ये ठेवण्याचा आणि सरकारी खर्चाने तिचे पालनपोषण करण्याचा आदेश दिला. या मुलीचा जीव वाचविणार्या नावाड्यालाही आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात याव्या, असेही त्यांनी सांगितले.
अवघ्या तीन आठवड्यांची चिमुकली
जन्मपत्रिकेत या नवजात मुलीचे नाव गंगा असे लिहिले आहे. तिचा जन्म २५ मे रोजी झाला होता. म्हणजेच तिचे वय फक्त तीन आठवडे आहे. नावाड्याच्या कुटुंबातील सदस्यांना या मुलीचे संगोपन करायचे होते, पण आता स्वत: उत्तरप्रदेश सरकारनेच तिची जबाबदारी उचलली आहे.