किमान तापमान : 23.61° से.
कमाल तापमान : 24.86° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 3.72 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.61° से.
22.99°से. - 28.15°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.12°से. - 27.6°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल25.32°से. - 28.13°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल25.39°से. - 28.77°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.4°से. - 28.37°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.85°से. - 28.36°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादलहरिद्वार, १५ जून – अशोक गहलोत सरकारविरोधात मनात ठासून भरलेला संताप पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचविण्यासाठी दिल्लीत आलेले कॉंग्रेसचे नेते सचिन पायलट यांना चार दिवसांच्या मुक्कामात पक्षश्रेष्ठींनी भेटीची वेळ दिली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या पायलटांनी आज मंगळवारी दिल्ली सोडली आणि उत्तराखंडमध्ये दाखल झाले. ते आता हरिद्वारला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सचिन पायलट दिल्लीहून जयपूरला दाखल होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, त्यांनी अचानकच उत्तराखंड गाठले. तिथे त्यांनी आपल्या काही समर्थकांशी बंदद्वार चर्चा केली.
कॉंगे्रसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका वढेरा यांची भेट घेण्यासाठी पायलट यांनी बरेच प्रयत्न केले. काही वरिष्ठ नेत्यांना भेटून त्यांनी राहुल आणि प्रियांका यांच्या भेटीची वेळ मिळावी, यासाठी आग्रह केला, पण चार दिवस प्रतीक्षा करूनही या दोन्ही नेत्यांची भेट होऊ शकली नाही, असे सूत्रांनी सांगितले.
पायलट यांना या दोघांनी साधा फोनही केला नाही. गहलोत यांच्या कारभाराविषयी त्यांना आपली भूमिका स्पष्ट करायची होती. यासाठीच ते दिल्लीत आले होते. निराश झाल्याने ते आता उत्तराखंडमध्ये आले असल्याचे सूत्रांचे मत आहे. मागील एक वर्षापासून सचिन पायलट आपल्या गटातील किमान सात सदस्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळावे यासाठी प्रयत्न करीत आहेत.