किमान तापमान : 25.19° से.
कमाल तापमान : 25.72° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 2.21 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.72° से.
24.15°से. - 28.89°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.8°से. - 28.3°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर घनघोर बादल24.7°से. - 28.55°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.02°से. - 28.98°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 29.35°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.29°से. - 29.02°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादलपंजाब उच्च न्यायालयाचा निर्वाळा,
चंदीगढ, १४ जून – काही दिवस एकत्र राहणे म्हणजे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ असल्याचे कायदेशीररीत्या मानले जाणार नाही, असा निर्वाळा पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला.
२० वर्षीय मुलगा आणि १४ वर्षीय मुलीने या संदर्भात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ती फेटाळून लावली. आम्ही लिव्ह-इन रिलेशनमध्ये असून, आपल्याला सुरक्षेची गरज आहे. नातेवाईकही आमच्यावर वेगळे होण्यासाठी दबाव आणत आहेत, असे या प्रकरणातील मुलीने न्यायालयाला सांगितले.
लिव्ह-इन रिलेशनमध्ये एकमेकांबाबत काही कर्तव्य आणि जबाबदार्या पाळल्या जाव्या, ज्या वैवाहिक जीवनामध्ये देखील आहेत, असे न्या. मनोज बजाज यांनी स्पष्ट केले.या प्रकरणात लग्नासाठी कायदेशीर असलेले वय कमी असताना मुलीच्या पालकांनी तिच्या लग्नची तयारी सुरू केली होती. त्यामुळे मुलगी आपले घर सोडून त्या मुलाकडे गेली. लग्नाचे वय होईपर्यंत लिव्ह-इनमध्ये राहण्याचे त्यांनी ठरवले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर माझ्या कुटुंबीयांनी आम्हाला धमकावण्यास सुरुवात केली. पोलिसांत तक्रार देऊनही कारवाई न झाल्याने आम्हाला न्यायालयात यावे लागले, असे त्यांनी सांगितले. आजपर्यंत दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले नाही. विवाहाचे योग्य वय होण्याची आम्ही वाट पाहात आहोत. त्यामुळे आमच्या जीवनात हस्तक्षेप करण्याचा कुणालाही अधिकार नाही, असा दावा त्यांनी केला. यावर न्यायालयाने असे नमूद केले की, दोन प्रौढ व्यक्तींना एकत्र राहण्याचा अधिकार आहे. तुमचे लग्नाचे वय अजून झाले नसल्याने, अल्पवयीन मुलीचा ताबा तिच्या पालकांकडे देण्यात यावा.