किमान तापमान : 24.28° से.
कमाल तापमान : 24.86° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 3.72 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.28° से.
23.99°से. - 28.15°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.12°से. - 27.6°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल25.32°से. - 28.13°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल25.39°से. - 28.77°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.4°से. - 28.37°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.85°से. - 28.36°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादलनातवासमोर अत्याचार, डोळ्यादेखत पतीची हत्या,
कोलकाता, १४ जून – पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांनंतर झालेल्या हिंसाचाराबद्दल अनेक महिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या महिलांनी विशेष तपास पथकातर्फे (एसआयटी) चौकशीची मागणी करून स्वत:वर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली आहे.
४ मे रोजी रात्री तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते जबरदस्तीने माझ्या घरात घुसले आणि नातवासमोरच आपल्यावर अत्याचार केला, असे एका ६० वर्षीय महिलेने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. हे प्रकरण पं. बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील आहे. तृणमूलकडून बदला घेण्याच्या उद्देशानेच बलात्कारासारखे गुन्हे घडवले जात आहेत, असे एका अहवालात यापूर्वीच नमूद करण्यात आले होते.
एवढेच नव्हे तर या महिलेने आपल्या अर्जात म्हटले की, बंगालमध्ये या घटना घडत असताना पोलिसांनी काहीही पावले न उचलल्याने या गोष्टींना अधिकच प्रोत्साहन मिळत आहे. याआधीही १८ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या याचिकेबाबत पश्चिम बंगाल सरकारला नोटिस पाठवली होती. निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारात दोन भाजपा कार्यकर्त्यांच्या मृत्यूच्या आरोपासंदर्भात ही याचिका होती.
याचिका करणार्या आणखी एका महिलेने म्हटले आहे की, आपल्या पतीने भाजपाचा प्रचार केला होता. यामुळेच तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कुर्हाडीने त्यांची हत्या केली. आपण स्वतःच्या डोळ्यांनी टीएमसी कार्यकर्त्यांकडून होणार्या हल्ल्यात आपल्या पतीचा जीव जाताना पाहिले, असे या महिलेने म्हटले. एवढेच नव्हे तर हल्लेखोरांनी या महिलेवर अत्याचाराचाही प्रयत्न केला. याशिवाय सर्वोच्च न्यायालयात एका १७ वर्षीय दलित मुलीने सांगितले की ९ मे रोजी तृणमूल कॉंग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी आपल्यावर अत्याचार केला. इतकेच नव्हे, तर याबाबत पोलिसांत तक्रार केल्यास तिच्या कुटुंबीयांना जिवे मारण्यात येईल अशी धमकी आपल्याला देण्यात आली, असा आरोप या पीडितेने सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या माध्यमातून केला. निवडणुकांनंतर झालेल्या हिंसाचारानंतर घर सोडून पळालेल्या लोकांना परत घरी आणण्यासाठी प्रयत्न करा, असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने बंगाल सरकारला दिला आहे.