किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलआमदार वेदप्रकाश सोलंकी यांचा आरोप,
जयपूर, १३ जून – राजस्थानमधील कॉंग्रेस सरकार पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता आहे. काही आमदारांचे फोन टॅप केले जात असल्याचा आरोप कॉंग्रेसचे आमदार वेदप्रकाश सोलंकी यांनी केला आहे. सोलंकी सचिन पायलट गटातील आमदार आहेत. कोणत्या आमदारांचे फोन टॅप केले जात आहेत, याची माहिती सोळंकी यांनी दिलेली नाही. मात्र, काही आमदारांनी फोन टॅप होत असल्याची माहिती दिल्याचा दावा त्यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राकडे केला आहे.
काही आमदारांनी मला त्यांचे फोन टॅप केले जात असल्याची माहिती दिली. हे सर्व कोणाच्या आदेशावरून केले जात आहे, त्याची मला कल्पना नाही. राज्य सरकार फोन टॅपिंगमध्ये सहभागी आहे की नाही, याबद्दल मी काही खात्रीने सांगू शकत नाही, असे सोलंकी यांनी सांगितले.
माझा फोन टॅप करण्यात येत आहे की नाही, याची मला कल्पना नाही. मात्र, काही आमदारांनी एका ऍपचा वापर केला होता. आपला फोन टॅप होत आहे का, हे तपासण्यासाठी त्यांनी ते ऍप वापरले. त्यातून त्यांना फोन टॅप केले जात असल्याचे समजले, असे सोलंकी म्हणाले.
काही आमदारांनी फोन टॅपिंगची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आहे. एसीबी काही आमदारांना अडकवण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती सरकारी अधिकार्यांनी आपल्याला दिल्याचा दावा देखील सोलंकी यांनी केला. पायलट गटाच्या आमदारांचेच फोन टॅप केले जात आहेत का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते कॉंग्रेसचे आमदार आहेत, असे उत्तर त्यांनी दिले. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीदेखील फोन आमदारांचे फोन टॅप होत असल्याचे आरोप झाले होते. त्यानंतरच राजस्थानच्या राजकारणात भूकंप झाला होता. पायलट समर्थकांनी बंड केले होते. अखेर पक्ष नेतृत्त्वाने हस्तक्षेप केल्यानंतर हे बंड शमले.