किमान तापमान : 27.69° से.
कमाल तापमान : 29.22° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 44 %
वायू वेग : 3.08 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.22° से.
23.94°से. - 29.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.38°से. - 28.63°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.28°से. - 29.45°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.43°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.15°से. - 28.01°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.72°से. - 27.96°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलहरयाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी ठणकावले,
चंदीगढ, २० मार्च – कुणीही यावे आणि बस्तान मांडावे, यासाठी भारत देश ही काही धर्मशाळा नाही, अशा शब्दांत हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी जोरदार ठणकावले आहे. हरयाणात आलेल्या रोहिंग्यांबाबत माहिती घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मागील काही दिवसांपासून देशात रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्न चर्चेत आहे. रोहिंग्यांनी जम्मू, हैदराबाद, उत्तरप्रदेश, राजस्थान आणि दिल्लीमध्ये आश्रय घेतल्याचे आढळून आले आहे. जम्मूमध्ये अनधिकृतरीत्या वास्तव्य करणार्या १६८ रोहिंग्यांना तुरुंगात पाठवण्यात आल्याची माहिती अधिकार्यांनी दिली असतानाच, हरयाणातील पलवल आणि मेवात जिल्ह्यातही त्यांचे वास्तव्य असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांशिवाय गुप्तहेर यंत्रणांकडून राज्यात आश्रय घेणार्या रोहिंग्यांबद्दल माहिती एकत्र केली जात आहे. याबाबतचा अहवाल आल्यानंतर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी जम्मूमध्ये दोन रोहिंग्यांविरोधात बनावट पारपत्र मिळवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रहमान आणि गफूर अशी त्यांची नावे असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.