किमान तापमान : 26.96° से.
कमाल तापमान : 29.61° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 5.95 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.61° से.
24.55°से. - 30.94°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.97°से. - 28.27°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.86°से. - 29.14°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.71°से. - 28.32°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.78°से. - 27.76°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.41°से. - 27.59°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलकोलकाता, १९ मार्च – तृणमूल कॉंग्रेस आणि डाव्यांच्या सत्ताकाळात बंगालला सर्व क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. या दोन्ही पक्षांच्या सत्ताकाळात बंगालमध्ये सिंडिकेट, गुंडा, माफिया राज निर्माण झाले, अशी घणाघाती टीका भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केली.
बंगालमध्ये यावेळी भाजपाचीच सत्ता येणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशा दोन सरकारची निवड बंगालमधील नागरिक यंदाच्या विधानसभा निवडणुकीत करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील सहा वर्षांच्या कारकीर्दीत एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा कलंक लागलेला नाही. केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना गरीबांपर्यंत अत्यंत पारदर्शी पद्धतीने पोहोचत आहेत. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी कोणताही मध्यस्थ नाही. अत्यंत पारदर्शीपणाने या योजनांची अंमलबजावणी केली जात असल्याचे विजयवर्गीय यांनी सांगितले.
दुसरीकडे बंगाल राज्य सरकारच्या योजना भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आहेत. यात पारदर्शकताही नाही. राज्याच्या योजना सिंडिकेटद्वारे चालवल्या जात आहेत. या योजनांचा लाभ मिळावा यासाठी बंगालमधील नागरिकांना लाच द्यावी लागत आहे, असा घणाघात त्यांनी तृणमूल कॉंग्रेसवर केला. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बंगालमध्ये १७ टक्के मते मिळाली होती. त्यावेळी या राज्यात भाजपाचा विस्तार होणे शक्य असल्याचे लक्षात आले होते. या राज्यातील नागरिकांना पर्याय हवा असून, भाजपाकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात असल्याचे या निवडणुकीत आमच्या लक्षात आले होते, असे त्यांनी सांगितले. २०१८ मध्ये झालेल्या पंचायत निवडणुकीत भाजपाच्या मतदारांना मतदानापासून वंचित ठेवले होते. त्याचा राग २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत फुटला. या निवडणुकीत भाजपा २ जागांवरून १८ जागांवर गेली, असे त्यांनी सांगितले.
मुक्त आणि निर्भय मतदानावर आयोगाने भर द्यावा : तृणमूल
नवी दिल्ली – तृणमूल कॉंगे्रसच्या शिष्टमंडळाने आज शुक्रवारी निवडणूक आयोगातील अधिकार्यांची भेट घेत, राज्यात मुक्त आणि निर्भय वातावरणात मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात सहकार्य करण्याची मागणी केली. केंद्र सरकार आपल्या अधिकारांचा गैरवापर करून, निवडणुकीत प्रभाव पाडण्याची भीतीही या शिष्टमंडळाने व्यक्त केली आहे.
नुकतेच तृणमूलमध्ये सहभागी झालेले यशवंत सिन्हा यांचाही शिष्टमंडळात समावेश होता. त्यांनी तीन मुद्यांवर चिंता व्यक्त केली. केंद्रीय योजनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र वापरले जात आहे आणि ही गंभीर बाब आहे. आयोगाने राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर केंद्रीय निमलष्करी दले तैनात करण्याचा आणि राज्य पोलिसांना २०० मीटर दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय देखील आमच्या चिंतेसाठी कारणीभूत असल्याचेही शिष्टमंडळाने म्हटले आहे. १० मार्च रोजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झालेला असतानाही आयोगाने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. उलट, या हल्ल्याला अपघाताचे स्वरूप दिले. हा सर्व प्रकार भाजपाच्या विशेषत: केंद्र सरकारच्या सूचनेवरून केला जात आहे का, अशी विचारणाही आम्ही आयोगाकडे केली, असे या शिष्टमंडळातील सदस्य सौगत रॉय यांनी सांगितले.