किमान तापमान : 26.96° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 45 %
वायू वेग : 5.33 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
23.94°से. - 29.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.38°से. - 28.63°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.28°से. - 29.45°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.43°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.15°से. - 28.01°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.72°से. - 27.96°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलदीदी बोले खेल होबे, बीजेपी बोले… होबे.. होबे, पंतप्रधान मोदींचा तृणमूल कॉंग्रेसवर वार!,
पुरुलिया, १८ मार्च – पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीची घोषणा होण्याआधीपासूनच ममता दीदी ‘खेल होबे’ असे नारे देत आहे. त्यांना राज्यात हिंसाचार आणि रक्तपाताचा खेळ कायम ठेवायचा आहे, पण बीजेपी बोले… होबे असे स्पष्ट करीत, आता हा खेळ कायमचा संपुष्टात येणार आहे, असा तृणमूलच्या नार्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी वार केला. बंगालमध्ये भाजपाचेच सरकार येणार असून, त्यानंतर फक्त विकासाचा खेळ सुरू होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
पुरुलिया येथे आयोजित विशाल जाहीर सभेत पंतप्रधान बोलत होते. आम्हाला फक्त विकास करायचा आहे, खेळ नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यासोबत मुळीच खेळायचे नाही. त्यांना त्यांचा हक्क द्यायचा आहे. केंद्र सरकारने सर्वच राज्यांना कोरोना संकटाच्या काळात स्वस्त दरात तांदूळ पाठविला होता. मात्र, तृणमूलच्या मंत्र्यांनी त्यातही घोटाळा केला. सामान्यांपर्यंत तो तांदूळ पोहोचलाच नाही, असा स्पष्ट आरोप मोदी यांनी केला.
एका अपघाताला ममतांनी घातपाताचा रंग दिला. आम्ही त्यांना या देशाचीच कन्या मानतो. त्या जखमी झाल्याचे दु:ख आम्हालाही झाले, पण त्यांनी सहानुभूती मिळविण्यासाठी अपघाताचे राजकारण केले, असे त्यांनी सांगितले.
कोलकात्यातील ब्रिगेड मैदानावर झालेल्या रॅलीनंतर जे बदल झाले आहेत, त्याला आपण सारेच साक्षी आहोत. दहा वर्षांपर्यंत हिंसाचाराचा आधार घेणार्या ममतांचा सूर देखील आता बदललेला आहे. त्यांना पराभवाच्या भीतीने ग्रासले आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.
सर्व भागांना रेल्वेशी जोडणार
प्रत्येक क्षेत्राला रेल्वे नेटवर्कशी जोडणे आमची प्राथमिकता आहे. २ मे पर्यंत प्रतीक्षा करा. हा दिवस निकालाचा आहे. त्यानंतर राज्यात भाजपाचेच सरकार येणार आहे. सत्तेच्या पहिल्या दिवसापासूनच विकासाची गंगा सुरू होणार आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी द्वेषभावनेपोटी रोखून धरलेले रेल्वेचे प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यावर आमचा भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माओवाद्यांना प्रोत्साहन दिले
ममता बॅनर्जी यांनी आपल्या १० वर्षांच्या सत्ताकाळात तुष्टिकरणाशिवाय काहीच केले नाही. सर्वसामान्य नागरिकांचे हक्क हिरावले आणि माओवादी कारवायांना प्रोत्साहन दिले. बांगलादेशी घुसखोरांना केवळ राजकीय फायद्यासाठी आश्रय दिला. स्थानिक गरीबांचे हक्क या घुसखोरांना दिले. आपल्या राज्यातील तरुण पिढी आणि महिलांवर काय परिणाम होईल, हा विचार देखील त्यांनी केला नाही, असा आरोप मोदी यांनी केला.
५० हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी
केंद्र सरकारने बंगालच्या विकासासाठी ५० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. बंगालचा एक आदर्श राज्य म्हणून विकास करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर राज्यातील कुणालाही रोजगाराच्या शोधात बाहेर जावे लागणार नाही, असे मोदी म्हणाले.