किमान तापमान : 26.96° से.
कमाल तापमान : 30.31° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 43 %
वायू वेग : 5.33 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.31° से.
23.94°से. - 31.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.38°से. - 28.63°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.28°से. - 29.45°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.43°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.15°से. - 28.01°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.72°से. - 27.96°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलबांकुरा, २१ मार्च – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी माझ्यावर आपला राग काढत आहेत. तृणमूल कॉंगे्रसचे लोक पोस्टर तयार करीत आहेत, ज्यात ममतांचे पाय माझ्या डोक्यावर दाखविले. ममता बॅनर्जी माझ्यासोबत फुटबॉल खेळत असल्याचे त्यात दिसते. तुमची इच्छा असेल, तर माझ्या डोक्यावर पाय ठेवू शकता, पण मी तुम्हाला बंगालच्या विकासावर पाय ठेवू देणार नाही, हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला चढविला.
तुमचा गढ आता कोसळला आहे. मी तुम्हाला आदिवासींच्या स्वप्नांना लाथ मारू देणार नाही. आम्ही बंगालच्या विकासासाठी येथील सरकारला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र, अजूनही येथील बहिणी आणि मुली पाण्याच्या एका एका थेंबासाठी भटकत आहेत. अनेक योजना प्रत्यक्षात का उतरल्या नाही, शेतकरी वर्षातून केवळ एकदाच पीक घेऊ शकतात, अशी स्थिती का आली, अशी विचारणा मोदी यांनी बंगालच्या बांकुरा येथील भव्य जाहीर सभेत केली.
तुष्टिकरण आणि मतांचे राजकारणामुळे तुम्ही कोणत्या थराला गेल्या. तुम्ही आपला हा खरा चेहरा दहा वर्षांआधीच दाखविला असता, तर बंगालमध्ये तुमचे सरकार कधीच आले नसते. हिंसाचार, अत्याचार आणि सर्वसाामान्यांवर अन्यायच करायचा होता, तर मॉं, माटी व मानुष हा नारा कशाला दिला. जेव्हा-जेव्हा मी नागरिकांचे प्रश्न ममतांना विचारतो, तेव्हा त्या अधिक संतप्त होतात आणि संपूर्ण राग माझ्यावर काढतात. आता तर त्यांना माझा चेहरा देखील पसंत नाही, असा टोला त्यांनी हाणला.
पराभवाच्या भीतीमुळेच इव्हीएमवर संशय
दहा वर्षांपूर्वी इव्हीएमद्वारे मतदान झाले आणि ममता बॅनर्जी बंगालमध्ये सत्तेत आल्या होत्या. आताही तेच इव्हीएम आहे, पण ममता त्यावर संशय घेत आहेत. त्यांना आपला पराभव दिसू लागला आहे. राज्यात येऊ घातलेली परिवर्तनाची लाट त्यांना दिसलेली आहे. जनता आपल्याला भ्रष्टाचार आणि हिंसाचाराचा खेळ खेळू देणार नाही, याची जाणीव त्यांना झाली आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले.