किमान तापमान : 27.05° से.
कमाल तापमान : 28.34° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 4.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.34° से.
24.55°से. - 28.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.91°से. - 28.4°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.68°से. - 28.77°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.68°से. - 28.73°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.16°से. - 28.59°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.07°से. - 27.85°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलतिंगखॉंग, २२ मार्च – कॉंग्रेसचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असा घणाघात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी आसाममध्ये केला. कॉंग्रेस संधिसाधूपणाचे राजकारण करीत आहे. हा पक्ष सत्तेत आल्यास आसाम अंधाराच्या गर्तेत जाईल, असेही त्यांनी दिब्रुगढ जिल्ह्यातील तिंगखॉंग मतदारसंघात प्रचार करताना सांगितले.
आसाममधील नागरिकांचे संरक्षण आणि त्यांची सेवा करण्यासाठी भाजपाने नेहमीच पुढाकार घेतला, असे त्यांनी सांगितले. संधिसाधूपणाचे राजकारण हेच केवळ कॉंग्रेसचे उद्दिष्ट आहे. या पक्षाने केरळात भाकपाच्या विरोधात मुस्लिम लीगसोबत आघाडी केली आहे. मात्र, बंगाल आणि आसाममध्ये भाकपासोबत हातमिळवणी केली, असे कॉंग्रेसच्या दुटप्पीपणाचे उदाहरण त्यांनी दिले.
हत्तीप्रमाणे कॉंग्रेसला दोन दात आहेत. या पक्षाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. कॉंग्रेस जे सांगते, नेमके त्याच्याविरुद्ध कृती या पक्षाची असते. हा पक्ष समाजात दुही निर्माण करीत आहे, अशी टीका त्यांनी केली.
विरोधी पक्ष हा काळोखाप्रमाणे असून, भाजपा विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तुम्हाला जर काळोख हवा असेल, तर तुम्ही कॉंग्रेससोबत जाऊ शकता. मात्र, तुम्हाला विकासाची गरज असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ द्या, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.