किमान तापमान : 26.73° से.
कमाल तापमान : 27.57° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 3.19 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.57° से.
24.55°से. - 27.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.91°से. - 28.4°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.68°से. - 28.77°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.68°से. - 28.73°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.16°से. - 28.59°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.07°से. - 27.85°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलतिरुवनंतरपुरम्, २२ मार्च – रालोआच्या तीन उमेदवारांचे अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळल्याने भाजपाला केरळ विधानसभा निवडणुकीत धक्का बसला आहे.
थल्लासेरी मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार आणि कन्नूरचे जिल्हाध्यक्ष एन. हरिदास यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला. त्यांच्या अर्जावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची स्वाक्षरी नसल्याने त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला, अशी माहिती निवडणूक अधिकार्याने दिली. गुरुवायूर मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार आणि महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष निवेदिदा सुब्रमणियम् यांचा अर्ज देखील याच कारणामुळे फेटाळण्यात आला.
इडुकी जिल्ह्यातील देविकुलम् मतदारसंघातील अण्णाद्रमुकच्या उमेदवार धनलक्ष्मी यांचा अर्ज पूर्णपणे भरण्यात न आल्याने निवडणूक अधिकार्याने फेटाळला. देविकुलम् मतदारसंघात अण्णाद्रमुकला भाजपाने पाठिंबा दिला आहे.
६ एप्रिल रोजी होणार्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेला अर्ज निवडणूक अधिकार्यांनी फेटाळल्याने भाजपाच्या दोन उमेदवारांनी या निर्णयाला केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयाने त्यांची याचिका दाखल करून निवडणूक आयोगाला नोटिस बजावून उत्तर मागितले आहे.