किमान तापमान : 25.19° से.
कमाल तापमान : 25.72° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 2.21 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.72° से.
24.15°से. - 28.89°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.8°से. - 28.3°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर घनघोर बादल24.7°से. - 28.55°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.02°से. - 28.98°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 29.35°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.29°से. - 29.02°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादलचंदीगढ, १० मार्च – केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला शस्त्र बनवून कॉंगे्रसने आज बुधवारी हरयाणातील मनोहरलाल खट्टर सरकारविरोधात विधानसभेत दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला. प्रस्तावाच्या बाजूने ३२ आणि विरोधात ५५ मते मिळाली. यामुळे कॉंगे्रस पक्ष पुन्हा तोंडघशी पडला आहे.
प्रस्तावावर सुमारे सहा तास चर्चा झाल्यानंतर मतविभाजन करण्याची मागणी कॉंगे्रसने केली. यानंतर विधानसभा अध्यक्ष ग्यानचंद गुप्ता यांनी निकाल जाहीर केला आणि प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचे सांगितले.
अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात भाजपाच्या ३९, मित्रपक्ष असलेल्या जननायक जनता पार्टीच्या १० आणि पाच अपक्ष तसेच हरयाणा लोकहित पार्टीच्या एका आमदाराने मतदान केले. तर, कॉंगे्रसच्या ३० आणि दोन अपक्ष आमदारांनी विरोधात मतदान केले.
यावेळी सभागृहात बोलताना खट्टर यांनी कॉंगे्रसवर जोरदार हल्ला चढविला. प्रत्येक सहा महिन्यात सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची सवय झाली आहे. कॉंगे्रसचा कुणावरच विश्वास नाही. सत्तेशिवाय राहणे अशक्य असलेला हा पक्ष आता विरोधी बाकावर बसून वैतागलेला आहे. कसेही करून सत्ता मिळवायची, याच ध्यासाने तो असे काही कारनामे करीत असतो, असा आरोप खट्टर यांनी केला.
केंद्र सरकारच्या लोकहिताच्या योजनांवरही या पक्षाचा विश्वास नाही. कृषी कायदे शेतकर्यांच्या हितात असतानाही, कॉंगे्रस शेतकरी आंदोलनाच्या अनुषंगाने आपला राजकीय स्वार्थ पूर्ण करीत आहे. जवानांच्या शौर्यावरही तो प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. बालाकोट हवाई हल्ला आणि व्याप्त काश्मिरातील सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागतो. खोट्यावर खोटे बोलण्याची सवय या पक्षाला लागली आहे, असे त्यांनी ठासून सांगितले.