किमान तापमान : 24.28° से.
कमाल तापमान : 24.86° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 3.72 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.28° से.
23.99°से. - 28.15°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.12°से. - 27.6°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल25.32°से. - 28.13°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल25.39°से. - 28.77°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.4°से. - 28.37°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.85°से. - 28.36°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादलडेहराडून, १० मार्च – भाजपाचे वरिष्ठ नेते तीरथसिंह रावत यांनी आज बुधवारी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते लवकरच आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत.
त्रिवेंद्रसिंह रावत यांनी मंगळवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज सकाळी भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत तीरथसिंह रावत यांची नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. दुपारी चार वाजता राजभवनात आयोजित समारंभात राज्यपाल बेबी राणी मौर्य यांनी रावत यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी भाजपाचे अनेक नेते उपस्थित होते.
रावत हे भाजपाचे पौडी गढवाल लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि पक्षाचे राष्ट्रीय सचिवही आहेत. २०१३ ते १५ या काळात ते उत्तराखंड भाजपाचे प्रदेशाध्यक्षही होते. साधी राहणी आणि जनसामान्यांत मिसळणे यासाठी ते विशेष ओळखले जातात.
एक वर्षाचा कार्यकाळ
त्रिवेंद्रसिंह रावत यांची मुख्यमंत्री म्हणून चार वर्षांची कारकीर्द येत्या १८ मार्च रोजी पूर्ण होणार होती, पण त्यापूर्वी त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे तीरथसिंह रावत यांना मुख्यमंत्रिपदाचा एक वर्षाचा कार्यकाळच मिळणार आहे.
पंतप्रधानांनी दिलेल्या शुभेच्छा
नवी दिल्ली ः शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रावत यांना नव्या कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रशासकीय आणि संघटनात्मक अनुभव असलेले रावत हे उत्तराखंडला आणखी समोर नेतील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.