किमान तापमान : 28.22° से.
कमाल तापमान : 29.4° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 39 %
वायू वेग : 2.56 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.4° से.
23.84°से. - 29.99°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.33°से. - 27.74°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल24.61°से. - 28.54°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.91°से. - 28.49°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर कुछ बादल25.02°से. - 28.97°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.45°से. - 28.82°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादलनंदीग्राम, १० मार्च – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नंदीग्राम येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा वाहनातून उतरताना पाय मुरगळल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आपल्यावर हल्ला करण्यात आला, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी विरोधकांवर केला आहे.
ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम येथे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास प्रचार सुरू होता. यावेळी वाहनातून उतरताना त्यांचा पाय मुरगळला. त्यांच्या पायाला सूज आली असून, स्थानिक डॉक्टरांनी केलेल्या उपचारानंतर कोलकाता येथे आणण्यात आले. त्यासाठी ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला. सध्या त्यांच्यावर एसएसकेएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नंदीग्राममध्ये माझ्यावर हल्ला करण्यात आला. वाहनाद्वारे चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप त्यांनी विरोधकांवर केला. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पायाला दुखापत झाल्याने त्यांचे पुढील काही कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
सीबीआय तपास करा : भाजपा
या प्रकरणी भाजपाने स्थानिक पोलिस आणि प्रशासनावर हल्ला चढवला. मुख्यमंत्र्यांचे सुरक्षापथक घटनेच्या वेळी काय करीत होते, असाही प्रश्न उपस्थित केला.
भाजपाचे नेते तसेच बंगाल प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटले की, हा सर्व प्रकार मतदारांकडून सहानुभूती मिळवण्याचा आहे. त्यांच्या पायाखालून जमीन सरकत चालली असून, केवळ नाटक सुरू आहे. बंदोबस्तात सुमारे २०० ते ३०० पोलिस असताना हल्ला कसा काय झाला आणि जर हल्ला झालाच असेल, तर निवडणूक आयोगाने या प्रकरणावर सीबीआय चौकशी करावी.