किमान तापमान : 24.69° से.
कमाल तापमान : 24.89° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 63 %
वायू वेग : 2.94 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.89° से.
24.41°से. - 28.58°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.07°से. - 29.1°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 28.81°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.93°से. - 29.28°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.59°से. - 28.72°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादल22.96°से. - 28.47°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलकोलकाता, ११ मार्च – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर बुधवारी हल्लाच झाला होता आणि त्यांना योग्य ती सुरक्षा पुरविण्यात अपयश आलेल्या निवडणूक आयोगानेच या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारायला हवी, असे मत तृणमूल कॉंगे्रसने व्यक्त केले आहे.
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याची जबाबदारी आयोगाचीच असते, त्यामुळे आयोग या प्रकरणातील आपली जबाबदारी नाकारू शकत नाही, असे तृणमूलच्या नेत्यांनी म्हटले आहे. पक्षाच्या एका शिष्टमंडळाने आज गुरुवारी आयोगाच्या अधिकार्यांची भेट घेतली. ममतांवर हल्ला होण्याची शक्यता असतानाही आयोगाने त्यांना योग्य ती सुरक्षा पुरवली नाही, असा आरोपही या नेत्यांनी केला आहे.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था अतिशय चांगली होती, पण निवडणुका जाहीर झाल्यानंतर ती बिघडली. आयोगाने राज्याच्या पोलिस महासंचालकांनाही हटविले आणि दुसर्याच दिवशी ममतांवर हल्ला झाला, असे या नेत्यांनी सांगितले.
तृणमूलचा जाहीरनामा लांबणीवर
दरम्यान, ममता बॅनजी यांना रुग्णालयात भरती करण्यात आल्याने, पक्षाचा निवडणूक जाहीरनामा तूर्तास लांबणीवर टाकण्यात आला आहे. आज गुरुवारी दुपारी हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात येणार होता.
ममतांची प्रकृती उत्तम
ममतांवर सरकारी रुग्णालयात उपचार केले जात असून, त्यांची प्रकृती आता उत्तम असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांच्या पायाला आणि खांद्याला दुखापत आहे, पण काळजी करण्यासारखे काहीच कारण नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.
तिकीट नाकारल्याने अण्णाद्रमुकच्या आमदाराचा राजीनामा
चेन्नई – तामिळनाडूत होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्याने, अण्णाद्रमुकचे आमदार एम. एस. आर. राजवर्मन यांनी आज गुरुवारी पक्षाचा राजीनामा देत, अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम् या पक्षात प्रवेश केला. यानंतर अण्णाद्रमुकच्या नेतृत्वाने या आमदाराला पक्षातून बडतर्फ केले.
राजवर्मन हे सत्तूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. इतक्या वर्षांपासून मी पक्षाची सेवा केली आहे, पण धनाढ्य लोकांसाठी मला उमेदवारी नाकारण्यात आली. माझ्या मतदारसंघातील तिकिट विकल्या गेले आहे, असा आरोप त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघमचे अध्यक्ष टी. टी. व्ही. दिनाकरन् यांच्या हातातच सत्तेची किल्ली राहणार आहे, असा दावाही त्यांनी केला.
वसलराज यांचा निवडणूक लढण्यास नकार
पुडुचेरी – पुडुचेरीचे माजी आरोग्यमंत्री आणि कॉंगे्रसचे ज्येष्ठ नेते ई. वसलराज यांनी यावेळची विधानसभा निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. पक्षाने आता तरुणांना संधी द्यावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. याचा अर्थ मी पक्ष सोडणार आहे, असा मुळीच नाही. पक्षाला मी सतत मार्गदर्शन करणार आहे. तरुणांच्या हातात पक्षाची सूत्रे द्यावी, असे माझे ठाम मत असल्याचे त्यांनी सांगितले.