किमान तापमान : 22.98° से.
कमाल तापमान : 24.96° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 66 %
वायू वेग : 3.61 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.98° से.
21.99°से. - 28.17°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.25°से. - 28.57°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.42°से. - 28.53°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.45°से. - 28.31°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.73°से. - 28.08°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल23.39°से. - 28.07°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादलनंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांच्यासोबत थेट लढत,
हल्दिया, १२ मार्च – तृणमूल कॉंग्रेसमधून भाजपात आलेले सुवेंदू अधिकारी यांनी आज शुक्रवारी नंदीग्राम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघातून त्यांची थेट लढत तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत होणार आहे.
जवळपास एक किलोमीटरची रॅली काढल्यानंतर त्यांनी येथील उपविभागीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. या रॅलीमध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि स्मृती इराणी सहभागी झाल्या होत्या. डिसेंबरमध्ये भाजपात दाखल झाल्यावर अधिकारी यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना आव्हान दिले आहे.
२०१६ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अधिकारी यांनी तृणमूलच्या उमेदवारीवर नंदीग्राममधून निवडणूक लढवत भाकपाच्या उमेदवाराचा ८१,२३० मतांनी पराभव केला होता. ममता बॅनर्जी यांनी बुधवारी नंदीग्राम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. डाव्यांच्या आघाडीने भाकपाच्या युवा नेत्या मिनाक्षी मुखर्जी यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
तृणमूलने केला नागरिकांचा विश्वासघात ः अधिकारी
बाहेरून आलेल्यांना मतदान करू नका, असे आवाहन करताना सुवेंदू अधिकारी यांनी सत्तेत आल्यानंतर तृणमूल कॉंग्रेसने नंदीग्राम येथील नागरिकांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. येथील नागरिकांना धोका देणार्या आणि बाहेरून आलेल्यांना मतदान करून आपले मत वाया घालवू नका, असे त्यांनी ममता बॅनर्जी यांचे नाव न घेता टीका केली. तृणमूल पक्ष आता खाजगी कंपनी झाला आहे. पक्षातील इतर नेत्यांना मत व्यक्त करण्याचा अधिकार नाही किंवा राज्याच्या सरकारमध्ये धोरण ठरवण्याचा अधिकारही त्यांना राहिलेला नाही, असा घणाघातही त्यांनी यावेळी केला.
कोलाथूर येथून लढणार स्टॅलिन
चेन्नई – द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन कोलाथूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून, ६ एप्रिल रोजी होणार्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी द्रमुकने १७३ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी राजकारणात पाऊल ठेवले आहे. ते चेपॉक-ट्रिप्लिकेन येथून निवडणूक लढवणार आहेत. द्रमुकने जाहीर केलेल्या १७३ जणांच्या उमेदवारी यादीत बहुतांश आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. दुरई मुरुगन, के. एन. नेहरू, के. पोनमुडी आणि एमआरके पनीरसेल्वम या मंत्र्यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली. तामिळनाडूमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली असून, आपण १५ मार्च रोजी उमेदवारी दाखल करू, अशी माहिती स्टॅलिन यांनी पत्रकार परिषदेत दिली. द्रमुक २०११ पासून सत्तेतून बाहेर आहे. यंदा अण्णाद्रमुक व त्याच्या सहकारी पक्षांचा पराभव करून सत्तेत परतण्यासाठी या पक्षाने कंबर कसली आहे. द्रमुकसोबत कॉंग्रेस, डावे पक्ष, एमडीएमके, व्हीसीके आणि इतर लहान पक्षांनी आघाडी केली आहे. एमडीएमके पक्षासह काही लहान पक्ष द्रमुकच्या उगवता सूर्य या निशाणीवर निवडणूक लढवणार आहे. द्रमुक आणि यासोबत आघाडी केलेले पक्ष १८७ मतदारसंघांतून निवडणूक लढवणार असल्याची माहिती स्टॅलिन यांनी दिली.
सत्तेत आल्यास नागरिकत्व कायद्याच्या विरोधात याचिका; गौरव गोगोई यांची माहिती
नवी दिल्ली – समाजात दुफळी निर्माण करण्यासाठी भाजपाकडून नागरिकत्व कायद्याचा वापर केला जात असल्याचा आरोप कॉंग्रेसचे नेते गौरव गोगोई यांनी आज शुक्रवारी केला. आसाममध्ये सत्ता मिळाल्यास, या कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून राज्यातील सरकारला पक्ष केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
आसाममधील विकास आणि ओळख विधानसभा निवडणुकीत पणाला लागली आहे. या राज्यात महाआघाडीचे सरकार सत्ता स्थापन करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कॉंग्रेस पक्षाने आसाममध्ये बद्रुद्दिन अजमल यांच्या नेतृत्वातील ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटसोबत (एआययूडीएफ) आघाडी केली आहे. कॉंग्रेसच्या या निर्णयावर भाजपाने टीका केली आहे. आसाममध्ये आम्ही धर्माच्या आधारावर नव्हे, तर नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आघाडी तयार केली आहे, असे उत्तर त्यांनी भाजपाच्या टीकेला दिले.
कॉंग्रेसने तयार केलेली महाजोत ही आघाडी सत्तेत आल्यास, तुम्ही मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असाल का, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, मी कोणत्याही पदासाठी काम करीत नाही. केवळ पक्षाची सेवा करीत आहे. पक्षाच्या आदेशाप्रमाणे मी काम करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. गौरव गोगोई यांचे वडील तरुण गोगोई यांचे मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात निधन झाले. त्यांनी तीन वेळा आसामचे मुख्यमंत्रिपद भूषविले आहे. वडिलांच्या निधनानंतर आसाममध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असून, ती कुणीही भरून काढू शकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांची कमतरता आम्हाला जाणवत आहे. मागील वर्षी ऑगस्टमध्ये अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या बैठकीत त्यांनी एफआययूडीएफ आणि अन्य समविचारी पक्षांसोबत आघाडी करावी, अशी सूचना केली होती, असे त्यांनी सांगितले.