किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.96° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 3.61 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.99°से. - 28.17°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.25°से. - 28.57°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.42°से. - 28.53°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.23°से. - 28.31°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.73°से. - 28.08°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल23.39°से. - 28.07°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादलस्मृती इराणी यांचा आसाममध्ये घणाघात,
मरियानी, १३ मार्च – कॉंग्रेस हा सर्वाधिक भ्रष्ट पक्ष आहे, असा घणाघात करताना, केंद्र आणि राज्याच्या विविध कल्याणकारी योजनांचा फायदा घ्यायचा असेल, तर भाजपाला मतदान करा, असे आवाहन केंद्रीय वस्त्रोद्योग, महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज शनिवारी येथे झालेल्या त्यांच्या पहिल्या प्रचारसभेत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी राज्यातील गरीब नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना आणल्या आहेत. कॉंग्रेस हा सर्वाधिक भ्रष्ट पक्ष आहे. गरिबांच्या कल्याणाकरिता केवळ भाजपाच झटत असतो. राज्यातील चहामळ्यांमधील कामगारांसाठी केवळ भाजपा सरकारने अथक काम केले आहे, असे त्यांनी सांगितले.
केंद्र आणि राज्य सरकारने गरिबांसाठी आणलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती देताना त्यांनी, कॉंग्रेस सरकारने गरिबांसाठी कधीच काम केले नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत नागरिक भाजपाला मतदान करतील, असे त्यांनी सांगितले.
आसाममधील एक दिग्गज नेते संपुआच्या काळात पंतप्रधान होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीतच आसाममध्ये एम्स रुग्णालय आले, अशी टीका त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे नाव न घेता केली. भाजपाचे येथील उमेदवार रामाणी तांटी यांच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. मरियानी मतदारसंघात तीनवेळा आमदार राहिलेले कॉंग्रेसचे दिग्गज आमदार रूपज्योती कुर्मी यांचे आव्हान तांटी यांच्यासमोर आहे.