किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.65° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 3.29 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.99°से. - 28.52°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.69°से. - 28.91°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.85°से. - 28.87°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.96°से. - 28.66°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.35°से. - 28.38°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल22.91°से. - 28.26°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादलनिवडणूक आयोगाच्या निरीक्षकांनी सादर केला अहवाल, पुरावे नसल्याचे स्पष्टीकरण,
नवी दिल्ली, १३ मार्च – पश्चिम बंगालच्या नंदीग्राम येथील सभेच्या काळात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पायाला झालेली दुखापत ही अपघातामुळेच असून, त्यांच्यावर हल्ला झाल्याचा कुठलाही पुरावा नाही, असा अहवाल निवडणूक आयोगाने या प्रकरणी नियुक्त केलेल्या निरीक्षकांनी आज शनिवारी दिला आहे.
विवेक दुबे आण अजय नायक या दोन विशेष निरीक्षकांची आयोगाने या घटनेचा तपास करण्यासाठी नियुक्ती केली होती. त्यांनी आपल्या अहवालात ममतांवर हल्ला झाल्याची शक्यता स्पष्टपणे नाकारली आहे. त्यांना दुखापत झाली, त्यावेळी त्या पोलिसांच्या कडक बंदोबस्तात होत्या. अशा स्थितीत हल्ला होणे शक्यच नाही, असे अहवालात नमूद आहे.
आम्ही घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले. त्यांच्या कारजवळ कुणीही बाहेरील व्यक्ती आले नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले. या अहवालामुळे ममता बॅनर्जी केवळ सहानुभूती मिळविण्यासाठी या अपघाताला घातपाताचा रंग देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अहवाल अर्धवट
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर झालेल्या कथित हल्ला प्रकरणी सादर केलेला अहवाल अर्धवट असून, घटनेची सविस्तर माहिती सादर करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने आज शनिवारी राज्याचे मुख्य सचिव अलापन बंडोपाध्याय यांना दिला आहे.
१० मार्च रोजीची नंदीग्राममधील घटना नेमकी काय होती आणि हल्ला असल्यास त्यामागे कुणाचा हात असू शकतो, याबाबतची संपूर्ण माहिती आयोगाने मागवली असल्याचे आयोगाच्या वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. बंगाल सरकारने शुक्रवारी आयोगाकडे जो अहवाल पाठविला आहे, तो अर्धवट असून, आवश्यक माहितीचा अभाव आहे. त्यातून काहीच स्पष्ट होत नाही. मोठ्या प्रमाणात गर्दी होती, असेही यात नमूद आहे. पण ज्यांच्यावर संशय आहे, त्यांच्याविषयी काहीच लिहिले नाही, असेही अधिकारी म्हणाला.