किमान तापमान : 27.69° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 35 %
वायू वेग : 3.08 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
23.94°से. - 30.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.38°से. - 28.63°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.28°से. - 29.45°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.43°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.15°से. - 28.01°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.72°से. - 27.96°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलसिद्धूंच्या वक्तव्याने पंजाबमध्ये खळबळ,
चंदीगढ, १३ जुलै – पंजाबमधील राजकारणात आपली डाळ शिजत नसल्याचे लक्षात आल्यानंतर कॉंगे्रसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी आता नवा राग आळवला आहे. माझे काम आणि माझी भूमिका केवळ आम आदमी पार्टीनेच ओळखली आहे, असे त्यांनी सांगितले. यामुळे सिद्धू आपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मात्र पंजाबच्या राजकारणात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
आम आदमी पार्टी विरोधक असूनही, माझे कार्य पंजाबच्या हिताचे आहे आणि मी पंजाबला मादकपदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी कसा संघर्ष करीत आहे, याची जाणीव या पक्षाला झाली आहे, असे सिद्धू यांनी आज मंगळवारी म्हटले आहे.
सध्या सिद्धू आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे. राज्य मंत्रिमंडळात आपल्याला उपमुख्यमंत्रिपद मिळावे, यासाठी सिद्धू सातत्याने कॉंगे्रसच्या केंद्रीय नेत्यांवर दबाव आणत आहेत. याच मुद्यावर त्यांनी अलिकडील काळात राहुल गांधी आणि प्रियांका वढेरा यांच्यासह काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटी देखील घेतल्या. मात्र, अमरिंदरसिंग यांच्या दिल्ली दौर्यानंतर सर्व चित्र बदलले. पक्षाने त्यांना काम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देतानाच, पुढील वर्षी होणारी विधानसभेची निवडणूकही त्यांच्याच नेतृत्वात लढविण्याचे स्पष्ट केले. यामुळे सिद्धूंनी आता केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचे गुणगान गाण्यास सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे.