|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:39 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 26.96° से.

कमाल तापमान : 30.99° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 42 %

वायू वेग : 5.95 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

30.99° से.

हवामानाचा अंदाज

24.55°से. - 30.99°से.

सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.97°से. - 28.27°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.86°से. - 29.14°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.71°से. - 28.32°से.

गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.78°से. - 27.76°से.

शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.41°से. - 27.59°से.

शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादल
Home » जम्मू काश्मीर-लद्दाख, राज्य » तोयबाच्या तीन अतिरेक्यांचा खात्मा

तोयबाच्या तीन अतिरेक्यांचा खात्मा

पाकिस्तानी कमांडरचा समावेश,
श्रीनगर, १४ जुलै – दक्षिण काश्मीरच्या पुलवामात जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी आज बुधवारी सकाळी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर एजाजसह तीन अतिरेक्यांचा चकमकीत खात्मा केला. एजाज हा पाकिस्तानी आहे, अशी माहिती पोलिस प्रवक्त्याने दिली.
या भागातील एका पडक्या घरात काही अतिरेकी आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी स्थानिक पोलिसांसह संयुक्त मोहीम हाती घेतली. परिसराची नाकेबंदी केल्यानंतर जवानांनी प्रत्येक घराची झडती सुरू केली. पडक्या घराजवळ जाताच, तिथे लपून बसलेल्या अतिरेक्यांनी गोळीबार केला. यावेळी ही चकमक झडली, असे प्रवक्ता म्हणाला.
आधीपासूनच सतर्क असलेल्या जवानांनी गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत तीन अतिरेक्यांना ठार केले. एजाज उर्फ अबु हुरैरा असे तोयबाच्या कमांडरचे नाव असून, तो पाकिस्तानच्या लाहोरचा रहिवासी असल्याची माहिती प्रवक्त्याने दिली. ठार झालेले अन्य दोन अतिरेकी स्थानिक असून, त्यांना शरण येण्यासाठी पुरेपूर संधी देण्यात आली होती. मात्र, ती नाकारून त्यांनी गोळीबार केला, असे प्रवक्ता म्हणाला. या भागात आणखी काही अतिरेकी लपले असल्याची शक्यता असून, जवानांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे, अशी माहिती प्रवक्त्याने दिली.
कुलगामध्ये शक्तिशाली आयईडी नष्ट
दरम्यान, कुलगाम जिल्ह्यातील चिनारच्या वृक्षाजवळ अतिरेक्यांनी पेरलेला शक्तिशाली आयईडी जवानांनी वेळीच नष्ट केला. यामुळे मोठा घातपात टाळण्यात यश आले आहे. काझिगुंड भागात हा आयईडी होता. त्याची माहिती मिळताच संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली होती, असे प्रवक्त्याने सांगितले.
अल् कायदाच्या आणखी तीन अतिरेक्यांना अटक; उत्तरप्रदेश एटीएसची कामगिरी
लखनौ – उत्तरप्रदेशच्या दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) लखनौ येथून दोन अतिरेक्यांना अटक केल्यानंतर आज बुधवारी आणखी तीन अतिरेक्यांना अटक केली आहे. अटक केलेल्या दोन अतिरेक्यांच्या चौकशीदरम्यान लखनौ येथे वास्तव्य असलेल्या शकील, मोहम्मद मुस्तकिन आणि मोहम्मद मईद या अतिरेक्यांची नावे समोर आली होती. त्यांना ताब्यात घेऊन एटीएसने चौकशी केली असता, अतिरेक्यांनी रचलेल्या कटात सहभागी असल्याची कबुली त्यांनी दिली. त्यानंतर या तिघांनाही अटक करण्यात आली.
शकील हा लखनौ येथील बांबू बाजारातील रहिवासी आहे. मोहम्मद मईद लखनौमधील न्यू हैदरगंज कॅम्पल मार्गावर राहतो, तर मुस्तकिन हा मूळचा मुजफ्फरनगर येथील असून, तो लखनौमधील सीतापूर मार्गावर असलेल्या मदेयगंजमध्ये वास्तव्य करतो.
या अतिरेक्यांनी लखनौ, अयोध्या, मथुरा आणि वाराणसीमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला होता. मात्र, एटीएसने वेळीच कारवाई करीत त्यांचा कट उधळला. एटीएसने रविवारी केलेल्या कारवाईदरम्यान त्यांचे दोन साथीदार पळ काढण्यात यशस्वी ठरले होते. या कटात सहभागी असलेल्या अतिरेक्यांचे अटकसत्र एटीएसने सुरू केले आहे.

Posted by : | on : 14 Jul 2021
Filed under : जम्मू काश्मीर-लद्दाख, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g