किमान तापमान : 26.6° से.
कमाल तापमान : 28.19° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 4.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.19° से.
23.94°से. - 28.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 28.79°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलगुजरातमधील या विमानतळावर मिळणार सर्व सुविधा,
गांधीनगर, १५ जुलै – गुजरात राज्याची राजधानी गांधीनगरमध्ये देशातील पहिले विमानतळाशी साम्य राखणारे रेल्वे स्थानक (अपग्रेड स्टेशन) बनवण्यात आले असून, त्याच्या छतावर पंचतारांकित हॉटल सुद्धा उभारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, शुक्रवारी आभासी पद्धतीने स्थानकाचा शुभारंभ होत आहे.
केंद्र सरकारच्या वतीने देशभरात १२५ अपगे्रड रेल्वे स्थानक बांधण्यात येत असून, यावर सुमारे ५० हजार कोटी रुपये खर्चाची तरतूद आहे. यातील पहिले स्थानक गांधीनगरमध्ये तयार झाले आहे. स्थानकाचा चेहरामोहरा आधुनिक विमानतळासारखा बनवण्यात आला आहे. याठिकाणी २ हजार २०० क्षमतेच्या प्रवाशांसाठी कोनकोर्स, ३१८ खोल्यांचे पंचतारांकित हॉटेल, थीम आधारित लायटिंग यासारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच, १०५ मीटर लांबीचे सर्वधर्मीय प्रार्थनागृह असून, ते खांबाशिवाय (कॉलम फ्री) उभारले आहे. त्याच्या छताला मेहराबचा आकार देण्यात आला आहे. स्थानकाची इमारत ग्रीन बिल्डिंगच्या रूपात विकसित असून, एसोचॅमने (वाणिज्य आणि उद्योग क्षेत्रातील संस्था) प्रमाणित केलेली आहे.
रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सुनील शर्मा यांच्यानुसार, विमानतळांशी समानता राखत गांधीनगर रेल्वेस्थानक विकसित केले आहे. प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. प्रवाशांसाठी २ हजार २०० इतकी कमाल क्षमता असलेला कोनकोर्स (मोठा कक्ष) बनवण्यात आला असून, बाहेर पडण्यासाठी दोन सब-वे आहेत. तिकीट खिडकी, लिफ्ट, रॅम्प, पार्किंग आदि सुविधा दिव्यांगांना येणार्या अडचणी लक्षात घेत उपलब्ध केल्या आहेत. आकर्षकता आणि सुंदरता वाढवण्याच्या दृष्टीने थीम लायटिंगही आहे. बाळांच्या स्तनपानासाठी वेगळ्या जागा निश्चित केल्या आहेत.
रेलोपोलिस आणि पंचतारांकित हॉटेल…
स्थानकात रेलोपोलिस नावाचे मार्केट हब उभारले असून, याठिकाणी रिटेल कंपन्यांना मिनी स्टोअर उघडण्याची सोय असेल. भविष्यात फुडकोर्ट आणि मनोरंजन सुविधाही विकसित केली जाणार आहे. स्थानकाच्या छतावर ७ हजार ४०० वर्ग मीटर क्षेत्राचे ३१८ खोल्यांचा समावेश असलेले ७९० कोटी रुपयांचे पंचतारांकित हॉटेल निर्माण केले आहे. ते खाजगी उद्योगाकडून संचालित केले जाईल.
ठळक वैशिष्ट्ये
प रेल्वेस्थानकाच्या छतावर पंचतारांकित हॉटेल
प देशभरातील २५ अपगे्रड स्थानकापैकी पहिले
प दिव्यांगांना विशेष सुविधा
प रेलोपोलिस नावाचे मार्केट हब
प देशी-विदेशी पाहुण्यांसाठी आधुनिक सोयी