किमान तापमान : 26.6° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
23.94°से. - 28.01°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 28.79°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलनवी दिल्ली, १७ जुलै – माझ्या राजीनाम्याबाबत अफवा उडवण्यात आल्या, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची आज शनिवारी भेट घेतल्यानंतर स्पष्ट केले. कर्नाटकमध्ये पक्ष मजबूत करून आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाला पुन्हा सत्तेत आणण्याचा आदेश त्यांनी दिला, अशी माहिती येदीयुरप्पा यांनी दिली.
या बैठकीत कर्नाटकातील भाजपाच्या स्थितीबाबत चर्चा करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. येदियुरप्पा यांनी संरक्षण मंत्री राजनाथसिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतही चर्चा केली. या व्यतिरिक्त त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी भेट घेतली. येदीयुरप्पा यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात त्यांना राजीनाम्याबाबत अंदाज वर्तवला जात होता.
कर्नाटकातील भाजपाच्या स्थितीबाबत आम्ही चर्चा केली. कर्नाटकमध्ये भाजपाला पुन्हा सत्ता मिळावी, या दिशेने काम करण्यास नड्डा यांनी मला सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मला हेच सांगितले आहे. खेळीमेळीच्या वातावरणात आमच्यात चर्चा झाली, असे त्यांनी सांगितले. कर्नाटकमध्ये २०२३ साली विधानसभा निवडणूक होत आहे. त्याची मोठी जबाबदारी जे. पी. नड्डा यांनी माझ्यावर टाकली आहे. राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी या भेटीनंतर माध्यमांना सांगितले.