|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:37 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 25.21° से.

कमाल तापमान : 25.73° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 56 %

वायू वेग : 2.3 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

25.73° से.

हवामानाचा अंदाज

23.68°से. - 28.61°से.

शुक्रवार, 22 नोव्हेंबर कुछ बादल
हवामानाचा अंदाज

24.11°से. - 28.99°से.

शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.75°से. - 28.8°से.

रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

24.78°से. - 28.5°से.

सोमवार, 25 नोव्हेंबर कुछ बादल
हवामानाचा अंदाज

25.03°से. - 28.91°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

24.82°से. - 29.26°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल
Home » पंजाब-हरयाणा, राज्य » नवज्योत सिद्धूंना हवे उपमुख्यमंत्रिपद

नवज्योत सिद्धूंना हवे उपमुख्यमंत्रिपद

पंजाबमध्ये पुन्हा वाद पेटला,
अमृतसर, १८ मे – पंजाबमधील विधानसभा निवडणूक एक वर्षावर आली असतानाच गटातटांनी विभागलेल्या पंजाब कॉंग्रेसमध्ये तीव्र मतभेद उफाळून आले आहेत. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय नवज्योतसिंग सिद्धू यांना उपमुख्यमंत्रिपद हवे आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे आता पंजाबमध्ये वाद पेटला आहे.
एकीकडे कॉंग्रेसकडून मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील मतभेद मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यांच्यातील वाद दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत आहे. दोन्ही नेत्यांमधील वाद असाच सुरू राहिला, तर आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका पक्षाला बसू शकतो, अशी चिंता कॉंग्रेसकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सिद्धू उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्षपद मिळविण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, अमरिंदरसिंग कुठल्याही परिस्थितीत सिद्धू यांना मंत्रिपदाखेरीज अधिक काही देण्यास इच्छुक नाहीत. सध्याच्या परिस्थितीची माहिती पक्षनेतृत्वाला असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी सांगितले.
पंजाबमध्ये कॉंग्रेसकडे अमरिंदरसिंग यांच्यापेक्षा मोठा चेहरा सध्या पक्षाकडे नाही. पक्षाने अमरिंदरसिंग यांच्याकडे दुर्लक्ष केले, तर पक्षाला राज्यात विजय मिळवणे शक्य होणार नाही. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसला पराभव पत्करावा लागला होता. पक्ष नेतृत्व अमरिंदरसिंह यांच्यावर दबाव आणण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे कॉंग्रेस पुढील निवडणूक अमरिंदरसिंगांच्या नेतृत्वात लढणार आहे.
फारसे पर्याय उपलब्ध नाही
कॉंग्रेसच्या अंदाजानुसार पंजाबमध्ये सिद्धूंकडे फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. शेतकरी आंदोलनामुळे राज्यात पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपाला यश मिळण्याची शक्यता कमी आहे. आम आदमी पक्ष पंजाबमध्ये दुर्बळ होत आहे. त्यामुळे पंजाबमधील पुढील विधानसभा निवडणुकीत मुख्य लढत कॉंग्रेस आणि अकाली दलातच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कितीही नाराज असले, तरी सिद्धू हे कॉंग्रेससोबतच राहतील, असा कॉंग्रेस नेतृत्वाचा अंदाज आहे.
प्रभाव अमृतसरपुरताच
दोन्ही नेत्यामधील वाद शमवून पक्षसंघटनेतील तणाव निवळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे सुनील जाखड यांनी सांगितले. मात्र, पक्षावर दबाव आणण्यासाठी सिद्धूंकडून अशाप्रकारचे राजकारण खेळले जात आहे, असे पक्षातील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थिती पक्षाने सिद्धू यांच्या म्हणण्याकडे फार लक्ष देता कामा नये. कॉंग्रेस नेत्यांच्या म्हणण्यानुसार, सिद्धू यांचा प्रभाव अमृतसरपुरताच मर्यादित आहे.

Posted by : | on : 18 May 2021
Filed under : पंजाब-हरयाणा, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g