किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 25.11° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 3.03 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.99°से. - 28.47°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.34°से. - 28.03°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर घनघोर बादल25.31°से. - 28.21°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.65°से. - 28.61°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.3°से. - 28.9°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.71°से. - 28.77°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादलकोलकाता, १८ मे – पश्चिम बंगालमध्ये नारदा घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या तृणमूल कॉंग्रेसचे आमदार मदन मित्रा आणि माजी मंत्री सोवन चॅटर्जी यांच्यानंतर मंगळवारी सकाळी सुव्रत मुखर्जी यांचीही प्रकृती बिघडली. त्यांना एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रात्री उशिरा मदन मित्रा आणि सोवन चॅटर्जी यांची तब्येत बिघडल्यानंतर दोन्ही नेत्यांना प्रेसिडेन्सी तुरुंगातून एसएसकेएम रुग्णालयाच्या वुडबर्न ब्लॉकमध्ये हलवण्यात आले होते.
सीबीआयने २०१४ मध्ये नारदा स्टिंग ऑपरेशनमध्ये पैसे घेताना आढळलेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या दोन मंत्र्यांसह एकूण चार नेत्यांना सोमवारी अटक केली होती. यात फिरहाद हकीम, सुव्रत मुखर्जी, आमदार मदन मित्रा आणि माजी तृणमूल नेते तसेच कोलकाताचे माजी महापौर सोवन चॅटर्जी यांचा समावेश आहे. आता अटक करण्यात आलेल्या नेत्यांपैंकी केवळ फिरहाद हकीम तुरुंगात आहेत.
सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तृणमूल नेते फिरहद हकीम, सुव्रत मुखर्जी, आमदार मदन मित्रा, सोवन चॅटर्जी यांना या प्रकरणात जामीन मंजूर केला होता. परंतु, कोलकाता उच्च न्यायालयाने रात्री उशिरा खालच्या न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली.
अनेक ठिकाणी जाळपोळ
या नेत्यांच्या अटकेविरोधात हुगळी, उत्तर परगणा आणि दक्षिण परगणा या जिल्ह्यांसह इतर भागात तृणमूल समर्थकांनी टायर जाळले, रस्ते अडवले. राज्यात झालेल्या निदर्शनांची दखल घेत राज्यपाल जगदीप धनकड यांनी मुख्यमंत्र्यांना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा आवाहन केले.
भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची नोटिस
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या काळात आणि निकाल जाहीर झाल्यानंतर तृणमूल कॉंगे्रसच्या गुंडांकडून भाजपा कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्येप्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणी करण्यास होकार दर्शविताना, सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी ममता बॅनर्जी सरकारला नोटिस जारी केली आहे.
या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या भाजपाच्या दोन कार्यकर्त्यांच्या कुटुंबीय सदस्यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या देखरेखीत सीबीआय किंवा अन्य स्वतंत्र तपास यंत्रणेकडून ही चौकशी केली जावी, अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे. न्या. विनीत सरन आणि न्या. भूषण गवई यांच्या न्यायासनाने याचिका दाखल करून घेत, ममता सरकार आणि राज्याच्या मुख्य सचिवांना नोटिस जारी केली.
आम्ही २५ मे रोजी या प्रकरणी सुनावणी करू, असे स्पष्ट करीत न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे वकील आणि प्रख्यात विधिज्ञ महेश जेठमलानी यांना, याचिकेची प्रत बंगाल सरकारच्या वकिलांना देण्याचा आदेश दिला. बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या, असंख्य घरांना आगी लावण्यात आल्या, महिलांवरही अत्याचार करण्यात आले. इतके गंभीर प्रकार सुरू असतानाही, राज्य सरकार, प्रशासन आणि पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली, असे जेठमलानी यांनी न्यायालयाला सांगितले.
हिंसाचाराच्या या घटनांची सीबीआय किंवा विशेष तपास पथकाद्वारे सखोल चौकशी व्हायलाच हवी. या हिंसाचारात राज्याचे पोलिसही दोषी आहेत, कारण त्यांच्या समक्ष हा सर्व हिंसाचार झाला, असेही ते म्हणाले.