किमान तापमान : 24.28° से.
कमाल तापमान : 24.86° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 3.72 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.28° से.
23.99°से. - 28.15°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.12°से. - 27.6°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल25.32°से. - 28.13°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल25.39°से. - 28.77°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.4°से. - 28.37°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.85°से. - 28.36°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादलदोन जहाजांमधील ३१४ जणांना वाचविले, गती मंदावली; धोका टळला, पण प्रभाव कायमच,
मुंबई/अहमदाबाद, १८ मे – महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागांमध्ये थैमान घातल्यानंतर टौकते चक्रीवादळ सोमवारी रात्री उशिरा गुजरातच्या किनापट्टीवर धडकले. यावेळी ताशी १८५ किमी असा वार्याचा वेग होता. किनारपट्टीच्या सर्वच शहरांमध्ये या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुसळधार पाऊस झाला. वार्याची गती इतकी प्रचंड होती की, तीन प्रवासी जहाज खवळलेल्या समुद्रात अडकले. या तिन्ही जहाजांमध्ये एकूण ७०७ कर्मचारी होते. त्यातील ३१४ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, इतर कर्मचार्यांना सुरक्षित काढण्यासाठी नौदल आणि तटरक्षक दल शर्थीचे प्रयत्न करीत आहे. रात्री उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती.
पी-३०५ या प्रवासी जहाजात २७३, एका तेल कंपनीच्या जहाजात १३७ आणि एसएस-३ या जहाजात १९६ कर्मचारी होते. हे तिन्ही जहाज मुंबईच्या समुद्री भागात १७५ किलोमीटर अंतरावर हीरा ऑईल फील्ड्जवळ अडकले होते. पी-३०५ हे जहाज समुद्रात बुडाले. याबाबतची माहिती मिळताच नौदलाने खवळलेल्या समुद्रात तत्काळ मोहीम राबवत या जहाजातील १७७ लोकांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर नौदल आणि तटरक्षक दलाच्या अन्य एका पथकाने तेल कंपनीच्या जहाजातून १३७ जणांना बाहेर काढले. तटरक्षक दलाने चेतक हेलिकॉप्टर्सचीही या मोहिमेत मदत घेतली.
गुजरातला धडक दिली, त्यावेळी चक्रीवादळाचा वेग ताशी १८५ किलोमीटर इतका होता. हवामान खात्याच्या माहितीनुसार, चक्रीवादळ धडकण्याची प्रक्रिया सुमारे दोन तास चालली. या काळात पावसाचे थैमान सुरूच होते. हवामान खात्याच्या मते, हे चक्रीवादळ गुजरातमध्ये मागील २३ वर्षांत धडक देणारे सर्वांत शक्तिशाली होते.
उत्तरेकडे वळले
गुजरातला धडक दिल्यानंतर चक्रीवादळ कमजोर झाले, पण त्याच्या प्रभावाने महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टी भागांसह अन्य ठिकाणीही दिवसभर पावसाचे थैमान सुरू होते. गुजरातमधून या चक्रीवादळाने उत्तरेकडे कूच केली. त्यावेळी त्याचा वेग फार जास्त नव्हता. या काळात अहमदाबादमध्ये अवघ्या एका तासात ३० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.
गुजरातमध्ये सात जणांचा मृत्यू
चक्रीवादळाच्या तडाख्यात किनारपट्टीच्या भागांत प्रचंड नुकसान झाले असून, झाडे पडणे आणि विजा कोसळणे यासारख्या घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू, तर अनेक जण जखमी झाले आहेत. १६ हजार घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ४० हजारांवर झाडे आणि एक हजारावर विजेचे खांब उन्मळून पडले आहे. दीड लाखांपेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
एनडीआरएफ आणि एसडीआरएफची ५४ पथके मदत आणि बचावकार्यासाठी तैनात होती. पोरबंदरमधील रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामधून प्राणवायूवर असलेल्या १७ कोरोनाबाधितांना इतर रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले होते, अशी माहिती मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी दिली.