किमान तापमान : 25.21° से.
कमाल तापमान : 25.73° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 2.3 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.73° से.
23.68°से. - 28.61°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर कुछ बादल24.11°से. - 28.99°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.75°से. - 28.8°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल24.78°से. - 28.5°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर कुछ बादल25.03°से. - 28.91°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.82°से. - 29.26°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादलनवज्योतसिंग सिद्धू यांचा आरोप,
चंदीगढ, १९ मे – पंजाब कॉंग्रेसमधील गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे. राज्याचे माजी मंत्री आणि कॉंग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यावर निशाणा साधला आहे. खरे बोलल्यामुळे पक्षातील सहकार्यांना धमकावले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचे राजकीय सल्लागार संदीप संधू यांनी धमकावल्याचा आरोप कॉंग्रेस आमदार परगटसिंग यांनी केला आहे. या पृष्ठभूमीवर सिद्धू यांनी हे वक्तव्य केले.
धार्मिक ग्रंथाच्या अवमाननेच्या घटनेवरून राज्य सरकारला प्रश्न केल्याने आपल्याला धमकावण्यात आले आहे. अमरिंदरसिंग आणि सिद्धू यांनी धार्मिक ग्रंथाच्या अवमानना प्रकरणाच्या चौकशीवरून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत.
धार्मिक ग्रंथाच्या अवमाननेविरोधात कोटकपुरामध्ये २०१५ मध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी गोळीबार केला होता. या प्रकरणी पोलिसांच्या विशेष कृती दलाने मागील महिन्यात उच्च न्यायालयात तपास अहवाल सादर केला. हा अहवाल न्यायालयाने रद्द केला.
कोटकपुरा गोळीबार प्रकरणी अमरिंदरसिंग जबाबदारी झटकत असल्याचा आरोप सिद्धू यांनी केला आहे. सिद्धू यांनी आपल्या टि्वटर हॅण्डलवरून परगटसिंग यांचा पत्रपरिषदेचा व्हिडीओ पोस्ट करीत सरकारला लक्ष्य केले. लोकांचे मुद्दे उपस्थित करून मंत्री, आमदार आणि खासदार पक्ष बळकट करीत आहेत.
आपली लोकशाहीची कर्तव्ये पूर्ण करत आहेत. आपल्या घटनात्मक अधिकारांचा उपयोग करीत आहेत. पण, खरे बोलणारी प्रत्येक व्यक्ती तुमची शत्रू ठरते, असे सिद्धू यांनी टि्वटमध्ये म्हटले. पक्षातील आपल्या सहकार्यांना धमकावून तुम्हाला असलेली भीती आणि असुरक्षितता समोर येत आहे, असे सिद्धू म्हणाले.
पक्षात कुठलीही गटबाजी नसल्याचे कॉंग्रेसकडून मंगळवारी सांगण्यात आले होते. पक्षातील नेत्यांचे वेगवेगळे विचार असू शकतात, असे पक्षाने म्हटले.