किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.37° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 2.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.99°से. - 28.89°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.8°से. - 28.3°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर घनघोर बादल24.7°से. - 28.55°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.02°से. - 28.98°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 29.35°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.29°से. - 29.02°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादलनारदा स्टिंग प्रकरण,
कोलकाता, १९ मे – तृणमूल कॉंगे्रसच्या मंत्र्यांविरोधात चार वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणी बंगालच्या दोन मंत्री आणि एका आमदाराला अटक करण्यात आल्यानंतर, मला देखील अटक करून दाखवा, असे थेट आव्हान देणार्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात सीबीआयने आज बुधवारी विशेष न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
बंगालमधील बोगस कंपन्यांकडून केवळ ममतांच्या मंत्र्यांनीच लाच घेतली नसून, स्वत: ममता देखील यात दोषी आहेत. या सर्व मंत्र्यांना आणि बोगस कंपन्यांना ममता बॅनर्जी यांचाच आशीर्वाद होता. त्यामुळे या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध कारवाई व्हायला हवी, अशी विनंती सीबीआयने याचिकेत केली आहे.
सीबीआयने १३३ पानांच्या याचिकेत ममतांचे सर्वाधिक विश्वासू कल्याण बॅनर्जी आणि मंत्री मलय घातक यांच्या नावांचाही उल्लेख केला आहे. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणी अटकेची कारवाई करीत असताना, ममता बॅनर्जी यांनी आमच्या कामात अडथळे आणले, धमक्या दिल्या, माझ्या परवानगीशिवाय तुम्ही मंत्र्यांना अटक केलीच कशी, आता मला देखील अटक करून दाखवा, असे त्या ओरडून सांगत होत्या, असा आरोपही सीबीआयने केला आहे.
ममता सरकारमधील दोन मंत्री आणि एका आमदाराला अटक करण्यात आल्यानंतर विशेष न्यायालयाने काही वेळातच त्यांना जामीन मंजूर केला होता. या विरोधात सीबीआयने उच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने जामीन रद्द करून, तिघांनाही दोन दिवसांची कोठडी ठोठावली होती. याच पृष्ठभूमीवर सीबीआयने हे संपूर्ण प्रकरण आता विशेष न्यायालयातून उच्च न्यायालयात वर्ग करण्यात यावे, अशी विनंतीही सीबीआयने केली आहे.