किमान तापमान : 23.61° से.
कमाल तापमान : 24.86° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 3.72 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.61° से.
22.99°से. - 28.15°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.12°से. - 27.6°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल25.32°से. - 28.13°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल25.39°से. - 28.77°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.4°से. - 28.37°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.85°से. - 28.36°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादलनारदा स्टिंग प्रकरणी सीबीआयची कारवाई, तृणमूल कार्यकर्त्यांची अधिकार्यांवर दगडफेक,
कोलकाता/नवी दिल्ली, १७ मे – प्रचंड गाजलेल्या नारदा स्टिंग ऑपरेशनप्रकरणी सीबीआयने आज सोमवारी धडक कारवाई करताना पश्चिम बंगाल सरकारमधील दोन मंत्री, एक आमदार आणि एका नेत्याला अटक केली. यानंतर सायंकाळी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या चौघांनाही जामीन मंजूर केला.
या कारवाईचा निषेध करीत तृणमूल कॉंगे्रसच्या कार्यकर्त्यांनी सीबीआय अधिकार्यांवर दगडफेकही केली. तिथेच संतप्त झालेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआयचे कार्यालय गाठले आणि माझ्या लोकांना सोडा अन्यथा मला देखील अटक करा, अशी भूमिका घेतली. यामुळे काही तासपर्यंत वातावरण प्रचंड तापले होते. सर्वसामान्य लोकांची कामे करण्यासाठी तसेच काही बोगस कंपन्यांचे व्यवहार सुरळीत करण्यासाठी ममतांचे मंत्री व नेते पैसे स्वीकारत असल्याचे या स्टिंग ऑपरेशनमध्ये कैद झाले होते. त्याच आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती सीबीआयचे प्रवक्ते आर. सी. जोशी यांनी नवी दिल्लीत पत्रकारांना दिली.
फिरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी, मदन मित्रा आणि सोवेन चॅटर्जी अशी अटक करण्यात आलेल्या नेत्यांची नावे आहेत. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली. २०१४ मध्ये हे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले होते. त्यावेळी हे चौघेही सरकारमध्ये मंत्री होते. सध्या जामिनावर असलेला पोलिस अधिकारी एस. एम. मिर्झा या प्रकरणातील पाचवा आरोपी आहे. आपल्या मंत्री व नेत्यांना अटक झाल्याची माहिती मिळताच ममता बॅनर्जी यांनी थयथयाट केला. त्यांनी थेट सीबीआयचे कार्यालय गाठले आणि सर्व मंत्री व नेत्यांना तत्काळ मुक्त करण्याची मागणी केली.
कोलकाता उच्च न्यायालयानेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपविले आहे आणि आजची कारवाई देखील न्यायालयाच्याच आदेशानुसार झाली असल्याने, ममता बॅनर्जी आमच्या कामात हस्तक्षेप करीत आहेत, असा आरोप जोशी यांनी केला. ही कारवाई करण्यापूर्वी सीबीआयने राज्यपाल जगदीप धनकड यांच्याकडे खटल्याची रीतसर परवानगी मागितली होती. त्यांनी ७ मे रोजी यासाठी परवानगी दिली होती.
काय आहे प्रकरण
नारदा स्टिंग ऑपरेशन हे नारदा टीव्ही न्यूज चॅनेलच्या वतीने मॅथ्यू सॅम्युअलने २०१४ मध्ये केले होते. यात तृणमूल कॉंग्रेसचे नेते, मंत्री लाभाच्या बदल्यात कंपनीकडून पैसे घेताना कॅमेर्यात कैद झाले होते. काही लोकांकडूनही त्यांनी पैसे घेतले होते.
कोलकाता उच्च न्यायालयाने २०१७ साली या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचा आदेश दिला होता. तृणमूल कार्यकर्त्यांचा हैदोस सीबीआयच्या कारवाईनंतर संपूर्ण बंगालमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. ठिकठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी टाळेबंदीचे सर्व नियमही तुडविण्यात आले.
सीबीआयचे कार्यालय आणि राजभवनाबाहेरही मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले होते. दोन्ही ठिकाणी असलेली सुरक्षा कठडेही तोडण्यात आली. यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधातही घोषणा देण्यात आल्या.