किमान तापमान : 28.22° से.
कमाल तापमान : 29.4° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 39 %
वायू वेग : 2.56 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.4° से.
23.84°से. - 29.99°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.33°से. - 27.74°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल24.61°से. - 28.54°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.91°से. - 28.49°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर कुछ बादल25.02°से. - 28.97°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.45°से. - 28.82°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादलमुख्तार अन्सारीच्या टोळीतील गुंडांची हत्या, चकमकीत हल्लेखोर अंशू दीक्षित ठार,
चित्रकुट, १४ मे – उत्तरप्रदेशातील चित्रकुट तुरुंगात आज शक्रवारी गोळीबार झाला. तुरुंगात असलेल्या दोन गटांनी हा गोळीबार केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या गोळीबारात दोन गुंडांची हत्या झाली असून, त्यापैकी एक मुख्तार अन्सारीच्या टोळीतील आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हत्या करणारा गुंडदेखील ठार झाला आहे. गोळीबारानंतर प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या चौकशीचा आदेश दिला आहे.
सुलतानपूर येथून चित्रकुट तुरुंगात हलवण्यात आलेला एक गुंड अंशू दीक्षित याने हा गोळीबार केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दीक्षित हा पूर्वांचल येथील आहे. या गोळीबारात मुकीम काला आणि मेराज नावाच्या गुंडाची हत्या करण्यात आली. त्यापैकी मेराज हा मुख्तार अन्सारीच्या टोळीतील गुंड असल्याचे सूत्रांनी सांगितले. अटक करण्यापूर्वी मुकीम कालावर उत्तरप्रदेश पोलिसांनी बक्षीस ठेवले होते.
मुन्ना बजरंगीच्या हत्येनंतर मेराज हा मुख्तार अन्सारीच्या जवळ गेला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. गोळीबार होताच वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांच्या पथकाने तुरुंगात धाव घेतली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अंशू दीक्षित ठार झाला, अशी माहिती पोलिस अधिकार्यांनी दिली. मेराज हा मुन्ना बजरंगीच्या टोळीतील सक्रिय सदस्य होता. शस्त्र परवान्याच्या बनावट नूतनीकरण प्रकरणी त्याच्या विरोधात ३ सप्टेंबर २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर फरार झालेल्या मेराजने वाराणसी येथील पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले होते.
मुकीम कालाच्या टोळीने सहारनपूर येथील तनिष्क ज्वेलरीच्या शोरूमवर १५ फेब्रुवारी २०१५ रोजी दरोडा घातला होता. त्यावेळी दोन भावंडांची आणि सहारनपूर येथील पोलिस शिपायाची हत्या करण्यात आली होती. नंतर उत्तरप्रदेशच्या विशेष कृती दलाने मुकीन काला आणि त्याच्या टोळीतील शार्प शूटरला २० ऑक्टोबर २०१५ रोजी अटक केली होती.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुंडांच्या विरोधात कठोर कारवाईचा आदेश दिल्यानंतर मुकीन कालाच्या टोळीविरोधात उत्तरप्रदेश पोलिसांनी कारवाई केली. या टोळीतील कित्येक गुंडांना ठार केले होते. काही दिवसांपूर्वी मुकीन कालाला हरयाणातील कुरुक्षेत्र येथील तुरुंगातून चित्रकुट येथील तुरुंगात हलवले होते.
अंशू दीक्षित हा मूळचा सीतापूर येथील रहिवासी होता. डिसेंबर २०१४ पर्यंत तो उत्तरप्रदेश पोलिसांसाठी डोकेदुखी ठरला होता. त्याच्यावर कित्येक गुन्हे दाखल होते. तो नेपाळ येथे पळ काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर उत्तरप्रदेश पोलिसांनी त्याला ५ सप्टेंबर २०१४ रोजी गोरखपूर येथून अटक केली होती.
अंशूने पाच कैद्यांना ठेवले होते ओलीस
मुकीम काला आणि मेराज अलीची हत्या केल्यानंतर अंशू दीक्षितने पाच कैद्यांना ओलीस ठेवले होते. त्यांना सोडण्याचे आवाहन तुरुंग प्रशासनाने केले. मात्र, त्याने हे आवाहन धुडकावले. त्यानंतर झालेल्या चकमकीत अंशू दीक्षित ठार झाला. चकमकीनंतर तुरुंगात तपासणी सुरू करण्यात आली.