किमान तापमान : 27.44° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 37 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
23.84°से. - 29.99°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 27.9°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल24.54°से. - 28.43°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.56°से. - 28.81°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.03°से. - 29.2°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.17°से. - 29.17°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल१३ मंत्र्यांचाही झाला शपथविधी,
गुवाहाटी, १० मे – ईशान्य लोकशाही आघाडीचे संयोजक हेमंत बिस्वशर्मा यांनी आज सोमवारी आसामचे पंधरावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत भाजपाप्रणीत रालोआतील अन्य १३ मंत्र्यांचाही शपथविधी पार पडला.
श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र सभागृहात आयोजित साध्या समारंभात राज्यपाल जगदीश मुखी यांनी बिस्वशर्मा आणि इतर मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. आसामला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकारण्यासाठी माझे सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
बिस्वशर्मा यांच्या सरकारमध्ये शपथ घेणारे दहा मंत्री भाजपाचे असून, यात प्रदेशाध्यक्ष रंजीतकुमार दास यांचाही समावेश आहे. आसाम गण परिषदेच्या दोन आणि यूपीपीएल पक्षाच्या एका सदस्याला मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. अजंता निओग या एकमेव महिला सदस्याचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला असून, त्या भाजपाच्या आहेत.
यावेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मावळते मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह, नागालॅण्डचे मुख्यमंत्री नेईफू रिओ आणि आसाम कॉंगे्रसचे अध्यक्ष रिपून बोरा उपस्थित होते.
मोदी, शाहांकडून अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री बिस्वशर्मा आणि अन्य मंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. सोनोवाल सरकारच्या काळात आसामच्या विकासाचा जो प्रवास सुरू होता, त्याला नवे मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार आणखी वेग देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.