किमान तापमान : 26.13° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 2.46 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
23.84°से. - 28.46°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.24°से. - 27.77°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल24.63°से. - 28.19°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.58°से. - 28.88°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.85°से. - 29.25°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.25°से. - 28.36°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादलकोलकाता, १० मे – बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम मतदारसंघात धक्कादायक पराभव करणारे शुभेंदू अधिकारी यांची आज सोमवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली. हे पद म्हणजे ममतांना पराभूत करण्यासाठी त्यांना मिळालेले मोठे बक्षीस मानले जात आहे. त्यांच्या या निवडीमुळे सभागृहात ममता बॅनर्जी विरुद्ध अधिकारी असा सामना रंगणार आहे.
भाजपा विधिमंडळ पक्षाच्या आज झालेल्या बैठकीत अधिकारी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी अधिकारी यांच्या निवडीची घोषणा केली. प्रसाद आणि भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस भूपेंद्र यादव केंद्रीय निरीक्षक होते.
या पदावर निवड केल्याबद्दल अधिकारी यांनी भाजपाच्या केंद्रीय नेत्यांचे आणि सर्व नवनिर्वाचित आमदारांचे आभार मानले. आपली जबाबदारी मी पूर्ण क्षमतेने पार पाडेल. या निवडणुकीतून तीन गोष्टी आपल्या निदर्शनास आल्या आहेत. पहिली बाब म्हणजे, एक पराभूत उमेदवार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतात. बंगालमध्ये असे पहिल्यांदाच घडले आहे. दुसरी म्हणजे, या विधानसभेत कॉंगे्रस आणि डाव्यांचा एकही प्रतिनिधी राहणार नाही आणि तिसरी व सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बंगाल विधानसभेत प्रथमच भाजपाचे ७७ आमदार दिसणार आहेत. भाजपा आमदारांची इतकी मोठी संख्या ममता बॅनर्जी यांना घाम फोडणारीच ठरणार असल्याचे अधिकारी यांनी सांगितले.