किमान तापमान : 25.94° से.
कमाल तापमान : 25.97° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 2.21 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.97° से.
24.76°से. - 28.47°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.34°से. - 28.03°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर घनघोर बादल25.31°से. - 28.21°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.65°से. - 28.61°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.3°से. - 28.9°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.71°से. - 28.77°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादलविधानसभा निवडणुकीसाठी ९७-२० जागांचे सूत्र,
चंदीगढ, १२ जून – पुढील वर्षी पंजाबमध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीसाठी शिरोमणी अकाली दल आणि बसपाने आज शनिवारी आघाडी केली आहे.
पंजाब विधानसभेच्या ११७ जागांपैकी २० जागा बसपा लढणार आहे, तर ९७ जागा शिरोमणी अकाली दल लढवेल, अशी माहिती अकाली दलाचे अध्यक्ष सुखबिरसिंग बादल यांनी पत्रपरिषदेत दिली. पंजाबच्या राजकारणात हा एक नवा अध्याय आहे, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पंजाबमधील सर्वांत मोठा पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलासोबत आघाडी करण्यात आली असल्याने आजचा दिवस ऐतिहासिक आहे. लोकसभा निवडणुकीसाठी १९९६ साली दोन्ही पक्षांनी आघाडी केली होती आणि १३ पैकी ११ जागांवर विजय मिळवला होता. या वेळी ही आघाडी तुटणार नाही, अशी प्रतिक्रिया बसपाचे खासदार सतीश मिश्रा यांनी आघाडीच्या घोषणेनंतर व्यक्त केली.
कॉंग्रेसच्या नेतृत्वात निर्माण झालेले घोटाळे आणि भ्रष्टाचार संपुष्टात आणण्यासाठी आम्ही एकत्रित काम करू. सध्याचे कॉंग्रेस सरकार शेतकरीविरोधी आहे. आम्ही पंजाबमधील प्रत्येक नागरिकाचे कल्याण आणि विकासासाठी काम करू, असेही त्यांनी सांगितले. जालंधरमधील कर्तारपूर साहिब, पश्चिम जालंधर, उत्तर जालंधर, फगवाडा, होशियारपूर शहर, दासुया, रूपनगर जिल्ह्यातील चमकौर साहिब, बस्सी पठाना, पठाणकोटमधील सुजानपूर, मोहाली, उत्तर अमृतसर, मध्य अमृतसर या विधानसभा मतदारसंघात बसपा लढणार आहे.