किमान तापमान : 26.99° से.
कमाल तापमान : 27.09° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 1.3 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
24.25°से. - 28.09°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.55°से. - 28.87°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.5°से. - 29.15°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.3°से. - 28.77°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.84°से. - 28.78°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.68°से. - 27.67°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलअमरिंदरसिंग यांचे सिद्धूंना आव्हान,
चंदीगड, २८ एप्रिल – पतियाळा मतदारसंघातून माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवा, असे थेट आव्हान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी माजी मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांना दिले आहे. पक्षात बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी सिद्धूंना ठणकावून सांगितले. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे.
नवज्योतसिंग सिद्धूंना माझ्याविरोधात निवडणूक लढवायची असेल तर ते स्वतंत्र आहेत. त्यांचे नशीबही जनरल जे. जे. सिंग यांच्यासारखे होईल. जनरल सिंग यांनी शिरोमणी अकाली दलाच्या तिकिटावर अमरिंदरसिंग यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती.
तुम्ही कॉंग्रेसचे सदस्य आहात की नाही, हे आधी स्पष्ट करा. कॉंगे्रसचे सदस्य असाल, तर मुख्यमंत्री आणि सरकारविरोधात सतत होत असलेले वक्तव्य शिस्तभंग मानले जाईल. त्यानुसार, कॉंग्रेसमधील असंतुष्ट गटाने आपली भूमिका स्पष्ट करावी. सिद्धूसारखे काही नेते पक्षशिस्त तोडण्यात व्यस्त आहेत. भाजपा त्यांना पुन्हा घेणार नाही. शिरोमणी अकाली दलही त्यांच्यावर संतप्त आहे, त्यामुळे कॉंगे्रसमध्ये राहायचे असेल, तर गंभीर विचार करा, असा इशाराही अमरिंदरसिंग यांनी दिला.
सिद्धू यांनी समाजमाध्यमावरून कॉंग्रेसचे नाव हटवले आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा अमरिंदरसिंग यांच्याविरोधात वक्तव्य करण्यास सुरुवात केली. ‘हम तो डुबेंगे सनम, तुम्हे भी ले डुबेंगे’, असा चिमटा सिद्धूंनी समाजमाध्यमावरून काढला.