किमान तापमान : 27.69° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 35 %
वायू वेग : 3.08 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
23.94°से. - 30.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.38°से. - 28.63°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.28°से. - 29.45°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.43°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.15°से. - 28.01°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.72°से. - 27.96°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलकोलकाता, २६ एप्रिल – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी आज सोमवारी ७६ टक्के मतदान झाले. वेळ संपल्यानंतरही अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा असल्याने, ही टक्केवारी ८० टक्क्यांपेक्षा जास्त राहण्याची शक्यता निवडणूक आयोगाने वर्तवली आहे. शेवटच्या टप्प्यातील मतदान गुरुवार, २९ एप्रिल रोजी होणार आहे.
हिंसाचाराच्या तुरळक घटना वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. मुर्शिदाबाद, पश्चिम वर्धमान, दक्षिण दिनाजपूर, मालदा आणि कोलकाता या पाच जिल्ह्यांमधील एकूण ३४ जागांसाठी आज सातव्या टप्प्याचे मतदान घेण्यात आले. कोरोनाविषयक नियमांचे काटेकोर पालन करून मतदारांनी मोठ्या संख्येत मतदान करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, तर कोरोनाला न घाबरता मतदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज सकाळी केले होते.
या टप्प्यात ३७ महिलांसह २६८ उमेदवार रिंगणात होते. मतदानासाठी १२,०६८ केंद्राची उभारणी करण्यात आली होती. पहिल्या सहा टप्प्यांच्या काळात झालेला हिंसाचार लक्षात घेता आयोगाने सुरक्षेचे कडेकोट उपाय योजले होते.
आठव्या टप्प्याचा प्रचार थांबला
दरम्यान, आठव्या आणि अंतिम टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी आज सायंकाळी शांत झाली. २९ एप्रिल रोजी या टप्प्यात ३५ जागांसाठी मतदान होणार असून, २८३ उमेदवार आपले भाग्य आजमावत आहेत.
ममता बॅनर्जींनी केले मतदान
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचा पारंपरिक गढ असलेल्या भवानीपूर येथे मतदानाचा हक्क बजावला. त्या व्हीलचेअरवर बसून मित्रा शाळेतील मतदान केंद्रावर गेल्या. मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या अभिप्रायाचे स्वागत केले.