|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:39 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.69° से.

कमाल तापमान : 28.56° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 44 %

वायू वेग : 3.08 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

28.56° से.

हवामानाचा अंदाज

23.94°से. - 28.99°से.

सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.38°से. - 28.63°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.28°से. - 29.45°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.43°से. - 28.72°से.

गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.15°से. - 28.01°से.

शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.72°से. - 27.96°से.

शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादल

चन्नी पंजाबमध्ये कॉंग्रेसची नौका बुडवणार

चन्नी पंजाबमध्ये कॉंग्रेसची नौका बुडवणारमुख्यमंत्रिपद न मिळाल्याने सिद्धूंचा थयथयाट, नवी दिल्ली, ८ ऑक्टोबर – मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये कॉंग्रेसची नौका बुडवल्याशिवाय राहणार नाही, मला मुख्यमंत्री बनवले असते, तर मी पक्षाला विजयी करून दाखवले असते, असे उद्गार पंजाब प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज प्रथमच नवज्योतसिंग सिद्धू यांनी काढले. सिद्धू यांनी अमरिंदरसिंग यांच्याविरुद्ध बंड पुकारले होते. त्याचीच परिणती अमरिंदरसिंग यांच्या मुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टीत झाली होती. मात्र, अमरिंदरसिंग यांच्या जागेवर मुख्यमंत्री म्हणून आलेल्या चरणजितसिंग चन्नी...9 Oct 2021 / No Comment / Read More »

सुरक्षेवरील बैठकीत चरणजितसिंग यांचा मुलगा

सुरक्षेवरील बैठकीत चरणजितसिंग यांचा मुलगापंजाबमध्ये नवीन वाद उफाळला, चंदीगड, ३ ऑक्टोबर – पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी सुरक्षेवरील घेतलेल्या अधिकृत बैठकीत त्यांचा मुलगा उपस्थित असल्याची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने पंजाबमध्ये नवीन वाद उफाळला आहे. मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी बुधवारीउच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी पंजाबचे पोलिस महासंचालक इकबाल प्रीतसिंग साहोटा यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. चन्नी यांचा मुलगा र्‍हितमजितसिंग हा या बैठकीत असल्याची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर भाजपाने मुख्यमंत्री चन्नी यांच्यावर टीका...3 Oct 2021 / No Comment / Read More »

पंजाब कॉंग्रेसमध्ये वादळ

पंजाब कॉंग्रेसमध्ये वादळसिद्धू व समर्थकांच्या राजीनामा सत्राने राजकीय भूकंप, चंदीगड, २८ सप्टेंबर – प्रदेशाध्यक्षपदी दोन महिन्यांपूर्वीच नियुक्त झालेले नवज्योतसिंग सिंद्धू यांनी आज मंगळवारी पदाचा राजीनामा दिला. यामुळे पंजाब कॉंगे्रसमध्ये नवे राजकीय वादळ उठले आहे. सिद्धू यांनी आज आपला राजीनामा कॉंगे्रसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठविला. मला तडजोड करणे मान्य नाही. तडजोड करणे म्हणजे आपले व्यक्तिमत्व पणाला लावण्यासारखे आहे. मी राजीनामा देत असलो, तरी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून कायम राहणार आहे. मला...28 Sep 2021 / No Comment / Read More »

अमरिंदरसिंग वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत

अमरिंदरसिंग वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीतदोन दिवसांच्या दौर्‍यासाठी दिल्लीत दाखल, चंदीगड, २८ सप्टेंबर – मुख्यमंत्रिपदाचा १८ सप्टेंबर रोजी राजीनामा दिल्यानंतर कॉंग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदरसिंग हे प्रथमच दोन दिवसांच्या दौर्‍यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. मी लवकरच मोठा निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले असून, त्यांच्या भविष्यातील राजकीय प्रवासाबाबत विविध शक्यता वर्तवल्या जात आहेत. दिल्लीत दाखल झाल्यानंतर अमरिंदरसिंग यांनी भाजपाच्या काही नेत्यांची भेट घेतल्याचे सांगितले जात होते. मात्र, ते वैयक्तिक दौर्‍यावर आहेत, अशी माहिती त्यांचे माध्यम सल्लागार रवीन...28 Sep 2021 / No Comment / Read More »

चन्नी मंत्रिमंडळाचा आज शपथविधी

चन्नी मंत्रिमंडळाचा आज शपथविधीमंत्र्यांच्या यादीला मिळाली दिल्लीची मंजुरी, नवी दिल्ली, २४ सप्टेंबर – पंजाबमध्ये चरणजितसिंग चन्नी मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या शनिवारी विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या यादीला दिल्लीत अंतिम रूप देण्यात आले. पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर चन्नी आपल्या दोन उपमुख्यमंत्र्यांसह दिल्लीत आले होते. त्यांच्यासोबत प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धूही होते. चन्नी आणि अन्य नेत्यांनी गुरुवारी रात्री कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पंजाबच्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा, तसेच कोणाला...25 Sep 2021 / No Comment / Read More »

चरणजितसिंग चन्नी पंजाबचे मुख्यमंत्री

चरणजितसिंग चन्नी पंजाबचे मुख्यमंत्रीसोनी, रंधावा यांचाही शपथविधी, चंदीगड, २० सप्टेंबर – कोणत्याही चर्चेत नसलेले कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते चरणजितसिंग चन्नी यांनी आज सोमवारी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सकाळी ११ वाजता राजभवनात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी चन्नी यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. पंजाबचे नेतृत्व करणारे ते पहिलेच दलित नेते ठरले असून, कॉंग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून दलित मतांना आकर्षित करण्यासाठी ही खेळी खेळली असल्याचे बोलले जात आहे. याच कार्यक्रमात सुखजिंदरसिंग...20 Sep 2021 / No Comment / Read More »

सिद्धूचे पाकिस्तानशी संबंध

सिद्धूचे पाकिस्तानशी संबंधमुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर अमरिंदरसिंगांचा हल्लाबोल, पंजाबसाठी आपत्ती ठरतील सिद्धू, इम्रान खान व बाजवाशी संबंध, मुख्यमंत्री केल्यास विरोध करणार, पक्षाला जो घ्यायचा आहे तो निर्णय घ्यावा, सर्व राजकीय पर्याय खुले असल्याची स्पष्टोक्ती, चंदीगड, १८ सप्टेंबर – अतिशय संघर्षपूर्ण घडामोडीत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी आज शनिवारी सायंकाळी पदाचा राजीनामा दिला. कॉंगे्रसमध्ये आलेल्या या राजकीय भूकंपासाठी कारणीभूत ठरणार्‍या घडामोडी आज सकाळपासूनच वेगाने सुरू झाल्या होत्या. सायंकाळी या भूकंपाने केवळ पंजाबच नव्हे, तर दिल्लीही...19 Sep 2021 / No Comment / Read More »

निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्या, अन्यथा…!

निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्या, अन्यथा…!नवज्योतसिंग सिद्धू यांचा इशारा, नवी दिल्ली, २७ ऑगस्ट – माझ्याकडे पंजाब कॉंगे्रसचे अध्यक्षपद तर सोपविण्यात आले, पण निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार नाही. हे अधिकार मला देण्यात यावे, अन्यथा मी पुन्हा एकदा उठाव केल्याशिवाय राहणार नाही, असा गर्भित इशारा कॉंगे्रसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी आज शुक्रवारी दिला. मला पद आहे, पण अधिकार नसल्याने मी स्वबळावर कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. पक्षाने अधिकार दिल्यास आगामी २० वर्षे पंजाबमध्ये फक्त कॉंगे्रसचीच सत्ता राहील,...28 Aug 2021 / No Comment / Read More »

अमृतसरमध्ये सापडला दोन किलो आरडीएक्सचा टिफिन बॉम्ब

अमृतसरमध्ये सापडला दोन किलो आरडीएक्सचा टिफिन बॉम्बचंदीगढ, ९ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिनापूर्वी पंजाब पोलिसांना अमृतसरमधील एका गावात दोन किलो आरडीएक्स असलेला टिफिन बॉम्ब आढळला. पाकिस्तानातून आलेल्या ड्रोनने हा बॉम्ब अमृतसरमध्ये टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांना ही स्फोटके वेळीच आढळल्याने मोठा अनर्थ टळला आहे. टिफिन बॉम्ब असलेल्या पिशवीत आणखी काही स्फोटके सापडली आहेत, अशी माहिती पंजाबचे पोलिस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी दिली. अमृतसरच्या ग्रामीण भागात रविवारी काही स्फोटके जप्त करण्यात आली. आम्हाला काही ग्रेनेड्‌स आणि...9 Aug 2021 / No Comment / Read More »

सिद्धूंनी स्वीकारली प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे

सिद्धूंनी स्वीकारली प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रेअमरिंदरसिंग यांची उपस्थिती, चंदीगड, २३ जुलै – नवज्योतसिंग सिद्धू यांनी आज शुक्रवारी पंजाब कॉंगे्रस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग प्रामुख्याने उपस्थित होते. यामुळे सिद्धू आणि अमरिंदरसिंग यांच्यातील कटुता संपली असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. प्रदेश कॉंगे्रसच्या मुख्यालयात आयाजित कार्यक्रमात सिद्धू यांच्यासोबतच संगतसिंग गिलझियान, सुखविंदरसिंग डॅनी, पवन गोयल आणि कुलजितसिंग नागरा या चार कार्याध्यक्षांनीही पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी कॉंगे्रसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. पंजाब कॉंगे्रसचे...23 Jul 2021 / No Comment / Read More »

नवज्योतसिंग सिद्धूंचे शक्तिप्रदर्शन

नवज्योतसिंग सिद्धूंचे शक्तिप्रदर्शनअमरिंदरसिंगांचा गट पडला कमजोर, चंदीगड, २१ जुलै – पंजाब कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी आज बुधवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत अमृतसरच्या सुवर्ण मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पक्षातील ६० पेक्षा जास्त आमदार उपस्थित होते. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यापेक्षा आपल्याकडे जास्त संख्याबळ आहे, हे दाखवितानाच, अमरिंदरसिंग यांची माफी मागण्यासही त्यांनी नकार दिला. मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी सिद्धू यांना सार्वजनिक रीत्या आपली माफी मागण्याचा आदेश दिला होता. मात्र, सिद्धू यांनी माफी मागण्यास नकार...21 Jul 2021 / No Comment / Read More »

अमरिंदरसिंग यांचे स्वपक्षीय नेत्यांना भोजनाचे निमंत्रण

अमरिंदरसिंग यांचे स्वपक्षीय नेत्यांना भोजनाचे निमंत्रणसिद्धूंना मात्र डावलले; पंजाबमध्ये धुसफूस सुरूच, चंदीगढ, १९ जुलै – पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदी कॉंग्रेसने नवज्योतसिंग सिद्धू यांना नियुक्त केले असले, तरी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांची आक्रमकता कायम आहे. नवज्योतसिंग सिद्धू वगळता पक्षातील अन्य नेत्यांना अमरिंदरसिंग यांनी भोजनाचे निमंत्रण दिले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. अमरिंदरसिंग यांनी पंचकुला येथे हा भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. याचे निमंत्रण त्यांनी पक्षाचे सर्व आमदार आणि खासदारांना दिले. मात्र, नवज्योतसिंग सिद्धू यांना निमंत्रण दिलेले नाही. पंजाब...20 Jul 2021 / No Comment / Read More »