किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलपंजाबमध्ये नवीन वाद उफाळला,
चंदीगड, ३ ऑक्टोबर – पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी सुरक्षेवरील घेतलेल्या अधिकृत बैठकीत त्यांचा मुलगा उपस्थित असल्याची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने पंजाबमध्ये नवीन वाद उफाळला आहे.
मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी बुधवारीउच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी पंजाबचे पोलिस महासंचालक इकबाल प्रीतसिंग साहोटा यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
चन्नी यांचा मुलगा र्हितमजितसिंग हा या बैठकीत असल्याची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर भाजपाने मुख्यमंत्री चन्नी यांच्यावर टीका केली आहे. अशा पद्धतीचा प्रकार यापूर्वी कधीच घडला नसल्याचे भाजपाचे पंजाब प्रदेशाध्यक्ष अश्विनी शर्मा यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी यापूर्वी मंत्रिपद भूषविले आहे, तसेच ते तीनवेळा आमदार झाले आहेत. त्यामुळे त्यांना प्रशासकीय नियम माहीत आहेत. घटनेतील नियमांचा आदर करताना विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा कायम ठेवणे आवश्यक आहे, असे शर्मा यांनी सांगितले. प्रशासकीय अधिकार्यांनी या प्रकारास मूकसमंती दिल्याचा आरोप त्यांनी अधिकार्यांवर केला आहे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्यांना नियम आणि निकष माहीत असतानाही त्यांनी ही चूक होऊ दिली, अशी टीका शर्मा यांनी केली आहे. या बैठकीसाठी पंजाबचे मंत्री परगटसिंग हेदेखील उपस्थित होते.
सिद्धू अजूनही नाराजच
दरम्यान, गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडींनंतरही नवज्योतसिंग सिद्धू अजूनही नाराज असल्याचे बोलले जात आहे. ज्या आपल्या मागण्यांसाठी सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, त्या मागण्यांवर ते अजूनही कायम असल्याचे कळते. त्यांचा राजीनामा मंजूर झाला की नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी सिद्धूंनी पंजाब सरकारला तीन प्रश्न विचारले आहेत.
अपमानप्रकरणी न्याय मिळण्याची मागणी पुढे रेटताना सिद्धू यांनी पुन्हा एकदा एजी-जीडी यांची नवनियुक्ती रद्द करण्याची मागणी केली आहे. असे केले नाही तर आम्ही कोणाला तोंड दाखविण्याच्या लायक राहणार नाही, असेही सिद्धू यांनी म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्यानंतर आता सिद्धूंनी जणू विद्यमान मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांना लक्ष्य केले की काय, असे वाटत आहे.