किमान तापमान : 26.96° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 45 %
वायू वेग : 5.33 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
23.94°से. - 29.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.38°से. - 28.63°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.28°से. - 29.45°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.43°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.15°से. - 28.01°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.72°से. - 27.96°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलममता बॅनर्जींचा ५८ हजार मतांनी विजयी,
कोलकाता, ३ ऑक्टोबर – तृणमूलच्या अध्यक्ष ममता बॅनर्जींची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची वाचली आहे. भवानीपूर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपाच्या प्रियांका टिबरेवाल यांच्यावर ५८ हजार मतांनी विजय मिळवला आहे. त्यांच्या या विजयानंतर तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला व ममता बॅनर्जींचे घर आणि पक्षाच्या कार्यालयासमोर मोठी गर्दी केली आहे.
ममता बॅनर्जी यांना १ लाख १५ हजार मते मिळाली आहेत. दक्षिण कोलकात्याचा भाग असलेल्या भवानीपूर मतदारसंघातील सर्व वार्डातून ममता बॅनर्जी यांना मताधिक्य मिळाले आहे. इतक्या मोठ्या मताधिक्यांने मिळालेला हा विजय एक विक्रम आहे. या विजयानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूरच्या सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मतदानाच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. या मतमोजणीमध्ये एकूण २१ फेर्या होत्या. भवानीपूर मतदारसंघासाठी ५७ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपच्या प्रियांका टिबरेवाल आणि सीपीएमचे श्रीजीव विश्वास यांचे आव्हान होते.
सामनावीर मीच
ममता बॅनर्जी यांनी विजय मिळवला असला, तरी सामनावीर मीच आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या उमेदवार प्रियांका टिबरेवाल यांनी मतमोजणीनंतर व्यक्त केली. ममतांचा गड असलेल्या भवानीपूरमध्ये मी २५ हजारांपेक्षा जास्त मते मिळवली आहेत. त्यामुळे या लढतीतीन सामनावीर मीच असल्याचे त्यांनी सांगितले.