किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलकलकत्ता उच्च न्यायालयाने ममता सरकारला फटकारले,
कोलकाता, ४ ऑक्टोबर – विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारातील पीडितांना नुकसान भरपाई कधी देणार, असा प्रश्न विचारत कलकत्ता उच्च न्यायालयाने आज सोमवारी ममता सरकारला फटकारले आहे. केवळ इतकेच नव्हे, तर एसआयटी तपासाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. उच्च न्यायालयाने ८ नोव्हेंबरपर्यंत ही सुनावणी पुढे ढकलली.
उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश राजेश बिंदल आणि न्या. राजर्षी भारद्वाज यांच्या खंडपीठाने सोमवारी सीबीआय आणि एसआयटीने सादर केलेल्या तपास अहवालावर सुनावणी केली. आतापर्यंत संबंधितांना नुकसान भरपाईची रक्कम न देणे म्हणजे एका गंभीर प्रकरणावर राज्य सरकार निष्काळजी असल्याचे दिसून येते, असेही न्यायालयाने सांगितले. कलकत्ता उच्च न्यायालयाने निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारातील हत्या, महिलांवरील अत्याचारासह अन्य गंभीर प्रकरणांच्या तपासणीचा आदेश सीबीआय आणि याव्यतिरक्त बाकी प्रकरणांचा तपास बंगाल पोलिसांच्या एसआयटीकडून करण्याचा आदेश दिला होता.
सीबीआयने सात प्रकरणांमध्ये ४० एफआयआर दाखल केल्यानंतर आरोपपत्र दाखल केले आहे. बंगाल सरकारने गठित केलेल्या तीन सदस्यीय एसआयटीला सहकार्य करण्यासाठी १० आयपीएस अधिकार्यांच्या नियुक्तीवर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. यावर राज्य सरकारने एसआयटी सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतरच संबंधित अधिकार्यांना नियुक्त केल्याचे सांगितले.