किमान तापमान : 26.14° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 2.98 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
23.94°से. - 28.01°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 28.79°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलउत्तरप्रदेश सरकारची घोषणा,
लखनौ, ५ ऑक्टोबर – उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी राजकीय वातावरण तापले असतानाच, आता या घटनेच्या चौकशीसाठी सहा सदस्यीय विशेष चौकशी समिती (एसआयटी) गठित करण्यात आल्याची घोषणा उत्तरप्रदेश सरकारने आज मंगळवारी केली.
याबाबत माहिती देताना उत्तरप्रदेश पोलिसांनी सांगितले की, आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांच्या निगराणीत न्यायालयीन चौकशीही होणार आहे. दरम्यान, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा म्हणाले की, जर कोणी त्यांचा मुलगा घटनास्थळी उपस्थित असल्याचा एक पुरावा सादर करेल त्याक्षणी मी आपल्या पदाचा राजीनामा देईन. दुसरीकडे शेतकरी संघटनांनी आरोप केला आहे की, आशिष मिश्रा यांच्या एका वाहनाने निदर्शने करीत असलेल्या शेतकर्यांना चिरडले. मिश्रा पिता-पुत्रांचे म्हणणे आहे की, आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला आणि एक वाहनचालक तसेच दोन भाजपा कार्यकर्त्यांची हत्या केली.
मुळात लखीमपूर खिरी येथील घटना अतिशय दुर्दैवी आहे. पण, विरोधी पक्ष त्याचे भांडवल करीत राजकारण करण्याच्या प्रयत्नात आहे, असे भाजपाने आज म्हटले आहे.
भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार चाहर म्हणाले की, जर या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू आहे, तर मग विरोधी पक्षातील नेते तेथे जाण्याची घाई का करीत आहेत? पहिले त्यांनी या प्रकरणी राज्य सरकारला आपली कार्यवाही करू द्यावी, मृतकांच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कार करू द्यावे आणि हे सर्व सोपस्कार आटोपल्यानंतर त्यांनी हमखास पीडितांच्या घरी जावे. पण, त्याआधी जाण्याचा आणि चौकशीमध्ये अडथळे आणण्याचा प्रकार करू नये. लखीमपूर प्रकरणी जोरकसपणे आरोप करणारे कॉंग्रेस नेते राजस्थानातील हनुमानगड येथे शेतकर्यांवर झालेल्या पोलिस लाठीमाराविषयी काहीच कसे बोलत नाहीत, असा सवालही खा. चाहर यांनी केला आहे.
प्रियांका वढेरांना अटक
लखीमपूर खिरीतील हिंसाचारानंतर शेतकर्यांची भेट घेण्यासाठी निघालेल्या कॉंग्रेस नेत्या प्रियांका वढेरांना उत्तरप्रदेश पोलिसांनी आज मंगळवारी ताब्यात घेतले. त्यांना सीतापूरच्या विश्रामगृहात ठेवण्यात आले होते. आता त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले असून, सीतापूर विश्रामगृहातच तात्पुरते तुरुंग स्थापन करून त्यांना बंदिस्त करण्यात आले आहे. पोलिसांनी प्रियांका वढेरा यांच्यासह दहा जणांवर शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.