किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलकॉंगे्रसचे २५ आमदार दिल्लीत मुक्कामी,
नवी दिल्ली, २ ऑक्टोबर – छत्तीसगडमध्ये नेतृत्वबदल करावा, या मागणीसाठी छत्तीसगडमधील २५ आमदार राजधानी दिल्लीत तळ ठोकून आहेत. मात्र, त्यांचे ऐकून घेण्यासाठी वेळ न देताना पक्ष नेतृत्वाने मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी वरिष्ठ पर्यवेक्षक म्हणून आज शनिवारी नियुक्ती केली.
कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अनुमतीने भूपेश बघेल यांची उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी वरिष्ठ पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे कॉंग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी आज सांगितले. बघेल उत्तरप्रदेशच्या प्रभारी आणि कॉंग्रेस महासचिव प्रियांका वढेरा यांना उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी तसेच पक्षसंघटनेतील कामासाठी मदत करतील, असे वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले. छत्तीसगडचे आरोग्यमंत्री टी. एस. सिंहदेव यांच्या नेतृत्वात प्रदेश कॉंग्रेसमधील एका गटाने मुख्यमंत्री बघेल यांना हटवण्याची मागणी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी कॉंग्रेसच्या नेतृत्वाने मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षासाठी राहील, असे आश्वासन आपल्याला दिले होते, असा सिंहदेव यांचा दावा आहे. बघेल यांची अडीच वर्ष पूर्ण झाल्यामुळे आता मुख्यमंत्रिपद आपल्याला मिळावे, अशी सिंहदेव यांची भूमिका आहे. बघेल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यासाठी सिंहदेव गटाचे २५ आमदार दोन-तीन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत. भूपेश बघेल यांना उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसचे पर्यवेक्षक बनवून कॉंग्रेसच्या नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला, असे मानले जात आहे.