किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलउत्तरप्रदेशातील घटना, आरोपी फरार,
कानपूर, ३० सप्टेंबर – आपल्या मित्रांसोबत गोरखपूरला फिरण्यासाठी दाखल झालेल्या कानपूरचे ३६ वर्षीय व्यापारी मनीष गुप्ता यांचा पोलिसांकडून करण्यात आलेल्या मारहाणीनंतर सोमवारी मृत्यू झाला होता. यामुळे उत्तरप्रदेशातील तणावात वाढ झाली असून, दोषींवर कारवाईसाठी सरकारवरही दबाव वाढल्याचे दिसून येत आहे.
या प्रकरणात रामगढताल पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकासह सहा पोलिस कर्मचार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक जगत नारायण सिंह, चौकी प्रभारी अक्षय मिश्र आणि उपनिरीक्षक विजय यादव यासहीत तीन अज्ञात पोलिस कर्मचार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुप्ता यांच्या पत्नीला सरकारी नोकरी आणि १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा उत्तरप्रदेश सरकारने केली आहे.
रामगढताल पोलिस स्टेशनमध्ये नव्या पोलिस निरीक्षकाची नेमणूकही करण्यात आली. तसेच या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी अजूनही फरार आहेत. गोरखपूरच्या रामगढताल भागात स्थित असलेल्या एका हॉटेलमध्ये मनीष गुप्ता, प्रदीप चौहान आणि हरदीपसिंह या मित्रांसोबत दाखल झाले होते. हॉटेलमध्ये चौकशीसाठी दाखल झालेल्या पोलिसांसोबत रात्री गुप्ता यांचा वाद झाला. यानंतर पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळे त्यांचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. मारहाणीत बेशुद्ध झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अगोदर एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मृत्यूनंतरही पोलिसांनी दीड तासांपर्यंत गुप्ता यांचा मृतदेह लपवून ठेवल्याचे समोर येत आहे.
मनीष गुप्ता यांच्या पत्नी मीनाक्षी गुप्ता यांच्याकडून न्याय मिळण्याची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याची मागणी मीनाक्षी यांनी केली. गुरुवारी सकाळी मोठी पोलिस सुरक्षा व्यवस्था तैनात करून कुटुंबीयांच्या उपस्थितीत मृतदेहावर अन्त्यसंस्कार करण्यात आले.