किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलसिद्धू व समर्थकांच्या राजीनामा सत्राने राजकीय भूकंप,
चंदीगड, २८ सप्टेंबर – प्रदेशाध्यक्षपदी दोन महिन्यांपूर्वीच नियुक्त झालेले नवज्योतसिंग सिंद्धू यांनी आज मंगळवारी पदाचा राजीनामा दिला. यामुळे पंजाब कॉंगे्रसमध्ये नवे राजकीय वादळ उठले आहे.
सिद्धू यांनी आज आपला राजीनामा कॉंगे्रसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठविला. मला तडजोड करणे मान्य नाही. तडजोड करणे म्हणजे आपले व्यक्तिमत्व पणाला लावण्यासारखे आहे. मी राजीनामा देत असलो, तरी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून कायम राहणार आहे.
मला आपल्या व्यक्तिमत्वाशी कोणतीही तडजोड करायची नाही आणि पंजाबच्या भवितव्याविषयी तर मुळीच तडजोड करू शकत नाही. पंजाबी नागरिकांच्या हितासाठी मी नेहमीच संघर्ष करणार आहे, असेही सिद्धू यांनी त्यात नमूद केले.
मर्जीतले अधिकारी हवे होते
सिद्धू यांना मुख्यमंत्रिपद तर हवे होतेच, शिवाय मर्जीतले पोलिस अधिकारी महत्त्वाच्या पदांवर नियुक्त करायचे होते. मात्र, चरणजितसिंग चन्नी यांच्याकडे मुख्यमंत्रिपद गेले त्यांच्या खास लोकांनाही मंत्रिमंडळात जागा मिळाली नव्हती. त्यातच रंधावा यांच्याकडे गृहमंत्रिपद दिल्यामुळे सिद्धू नाराजे झाले होते.
पंजाब कॉंग्रेसमध्ये अराजकतेची स्थिती : आप
नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिल्यानंतर आपने कॉंग्रेसवर टीका केली. पंजाब कॉंग्रेसमध्ये पूर्णपणे अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. कॉंग्रेसचे नेते स्वार्थी असून, अशा परिस्थितीत कॉंग्रेस पक्ष पंजाबमध्ये स्थिर सरकार देईल, अशी अपेक्षा नागरिक करू शकत नाहीत, अशी टीका आपचे नेते राघव चढ्ढा यांनी ट्विट करीत केली.
रझिया सुल्ताना यांचाही राजीनामा
सिद्धू यांच्यापाठोपाठच त्यांच्या समर्थक आणि कॅबिनेट मंत्री रझिया सुल्ताना यांनी देखील पदाचा राजीनामा देऊन सिद्धू यांना पाठिंबा दिला आहे. कॉंग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासोबत एकजूट राहण्यासाठी पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.