किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलदोन दिवसांच्या दौर्यासाठी दिल्लीत दाखल,
चंदीगड, २८ सप्टेंबर – मुख्यमंत्रिपदाचा १८ सप्टेंबर रोजी राजीनामा दिल्यानंतर कॉंग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदरसिंग हे प्रथमच दोन दिवसांच्या दौर्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. मी लवकरच मोठा निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले असून, त्यांच्या भविष्यातील राजकीय प्रवासाबाबत विविध शक्यता वर्तवल्या जात आहेत.
दिल्लीत दाखल झाल्यानंतर अमरिंदरसिंग यांनी भाजपाच्या काही नेत्यांची भेट घेतल्याचे सांगितले जात होते. मात्र, ते वैयक्तिक दौर्यावर आहेत, अशी माहिती त्यांचे माध्यम सल्लागार रवीन ठकराल यांनी दिली.
अमरिंदरसिंग यांच्या दिल्ली दौर्यावरून विविध प्रकारची वृत्ते समोर आली. मात्र, ते वैयक्तिक दौर्यावर आहेत. या कालावधीत ते काही मित्रांची भेट घेणार आहेत, तसेच नवीन मुख्यमंत्री चरणजिससिंग चन्नी यांच्यासाठी कपूरथळा हाऊस हा बंगला खाली करणार आहेत. त्यांच्या दौर्याबाबत राजकीय तर्क वर्तवण्याची गरज नाही, असे ठकराल यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मी काही कामासाठी दिल्लीला जात आहे. मी कपूरथळा हाऊस सोडणार आहे, असे अमरिंदरसिंग यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी चंदीगड येथील विमानतळावर माध्यमांना सांगितले होते.
माझ्याबाबत प्रसारमाध्यमांकडून अनावश्यक अंदाज वर्तवला जात आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. अमरिंदरसिंग दिल्ली विमानतळावर दाखल होण्याच्या काही वेळापूर्वी कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी हिमाचल प्रदेशचा दौरा संपवून दिल्ली विमानतळावर परतले होते.
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मला अपमानास्पद वाटत असल्याचे अमरिंदरसिंग यांनी सांगितले होते. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी अपरिपक्व नेते असल्याची टीका त्यांनी केली होती. नवज्योतसिंग सिद्धू देशद्रोही आणि धोकादायक असल्याचे स्पष्ट करीत, पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्याविरोधात उमेदवार देईल, असेही त्यांनी सांगितले होते.
सिद्धूला काढला चिमटा
सिद्धू यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी जोरदार चिमटा काढला आहे. सिद्धू पंजाबचे हित साधणारी व्यक्ती नाही, त्यांचा थेट पाकिस्तानशी संबंध आहे आणि ते अस्थिर मनाचे आहेत, हे मी यापूर्वीही सांगितले होते. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पंजाबसारख्या संवेदनशील राज्यासाठी सिद्धूसारख्या व्यक्तीची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करणे म्हणजे पंजाबच्या हिताशी तडजोड करण्यासारखेच आहे.