किमान तापमान : 24.97° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 50 %
वायू वेग : 4.96 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.58°से. - 26.11°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.36°से. - 27.01°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश24.95°से. - 27.79°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.46°से. - 28.06°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.51°से. - 27.86°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.2°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी कुछ बादलहैदराबाद, २७ सप्टेंबर –
इस्लामिक कट्टरतावाद दर्शवण्यासाठी एका हातात शस्त्र आणि दुसर्या हातात ‘कुराण’ असलेल्या एका दहशतवाद्याचे छायाचित्र पाठ्यपुस्तकात वापरण्यात आल्याचे समोर आल्यानंतर तेलंगणात एकच गदारोळ उठला.
इयत्ता आठवीच्या समाजशास्त्र (इंग्रजी माध्यम) विषयाच्या पुस्तकातील ‘प्रश्न बँके’त या छायाचित्राचा वापर करण्यात आला आहे. मात्र, ही बाब समोर आल्यानंतर तत्काळ हा मजकूर हटवण्याचे आदेश तेलंगणा सरकारने दिले आहेत.
इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात ‘इस्लामिक कट्टरतावाद’ दर्शवण्यासाठी वापरण्यात आलेले हे छायाचित्र तत्काळ हटवण्याची मागणी स्टुडंटस् इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाकडून करण्यात आली होती. पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांसमोर चुकीची प्रतिमा तयार होत असल्याचे सांगत एसआयओने या छायाचित्राला तीव्र विरोध केला आहे.
या छायाचित्रात एक दहशतवादी आपल्या उजव्या हातात एक रॉकेट लॉन्चर घेऊन उभा आहे तर दुसर्या हातात मुस्लिम पवित्र ग्रंथ कुराणची प्रत दिसते. हा फोटो ‘राष्ट्रीय आंदोलन-अंतिम चरण १९१९-१९४७’ अध्यायात प्रकाशित करण्यात आला होता. एसआयओ या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ. तल्हा फैयाजुद्दिन यांनी अशा प्रकारे ‘इस्लामोफोबिक कंटेन्ट’ तयार करून प्रकाशित करणार्या प्रकाशकाची निंदा केली. त्यांनी राज्याचे शिक्षणमंत्री पी. सबिता इंद्रा रेड्डी यांच्याकडे बेजबाबदार प्रकाशकावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
अशा प्रकारचा मजकूर, मुस्लिम समाजाप्रती रुढीवादी, घृणास्पद आणि इस्लामोफोबिक दृष्टिकोन निर्माण आणि प्रचार करणारा असल्याचे डॉ. फैयाजुद्दिन यांनी म्हटले आहे. शैक्षणिक संस्था आणि पाठ्यपुस्तकांतून विद्यार्थ्यांना शांतीचे धडे दिले जायला हवेत, यावर त्यांनी जोर दिला. पाठ्यपुस्तकातील हा मजकूर त्वरित हटवून ही पुस्तके नव्याने प्रकाशित करण्यात यावीत, अशी मागणी एसआयओकडून करण्यात आली.