किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.19° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.63 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.45°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश24.98°से. - 27.28°से.
शनिवार, 25 जानेवारी कुछ बादल25.48°से. - 28.18°से.
रविवार, 26 जानेवारी छितरे हुए बादल25.59°से. - 27.73°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.32°से. - 27.45°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल24.72°से. - 26.64°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलजितीन प्रसाद यांचा समावेश,
लखनौ, २६ सप्टेंबर – एकीकडे राजकीय वर्तुळामध्ये उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच, योगी आदित्यनाथ सरकारमध्ये सात नव्या मंत्र्यांचा प्रवेश झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी या नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
विधानसभा निवडणुकीपूर्वी योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळ विस्तार करणार अशी चर्चा होतीच. अपेक्षेनुरूप आदित्यनाथ यांनी आजच्या विस्तारात विविध जाती, समुदायांना योग्य स्थान देत समतोल साधला आहे. विशेष म्हणजे, कॉंग्रेसमधून भाजपात आलेले जितीन प्रसाद यांचाही समावेश करण्यात आला. जितीन प्रसाद यांच्यासह मंत्रिपदाची शपथ घेणार्यांमध्ये पलटू राम, संजीव कुमार, संगीता बिंद, दिनेश खटिक, धर्मवीर प्रजापती आणि छत्रपाल गंगवार यांचा समावेश आहे. जितीन प्रसाद हे एकमेव कॅबिनेट दर्जाचे मंत्री राहणार असून, बाकी सर्व राज्यमंत्री असतील.
शेतकर्यांना भेट
शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी उसाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करताना, शेतकर्यांच्या वीज बिलाचे व्याजही माफ करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी भाजपा किसान संमेलनात मुख्य पाहुणे म्हणून हजेरी लावली. यावेळी उपस्थित शेतकर्यांना संबोधित करताना त्यांनी या घोषणा केल्या. सध्या राज्यात उसाला प्रतिक्विंटल ३२५ रुपये इतका भाव आहे. यात वाढ करून हे मूल्य ३५० रुपये करण्यात आले आहे. ४५ लाख उस उत्पादक शेतकर्यांना फायदा होणार आहे. आम्ही आमच्या कार्यकाळात कोणतेही कारखाने विकण्याचा प्रकार केला नाही. बसपा आणि समाजवादी पार्टीच्या काळात राज्यातील २१ साखर कारखाने बंद पडले होते. आम्ही बंद कारखान्यांना सुरू करण्याचे काम केले, असे योगी म्हणाले.