किमान तापमान : 23.43° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.26 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.49°से. - 26.45°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश24.98°से. - 27.28°से.
शनिवार, 25 जानेवारी कुछ बादल25.48°से. - 28.18°से.
रविवार, 26 जानेवारी छितरे हुए बादल25.59°से. - 27.73°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.32°से. - 27.45°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल24.72°से. - 26.64°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलमंत्र्यांच्या यादीला मिळाली दिल्लीची मंजुरी,
नवी दिल्ली, २४ सप्टेंबर – पंजाबमध्ये चरणजितसिंग चन्नी मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या शनिवारी विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या यादीला दिल्लीत अंतिम रूप देण्यात आले.
पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर चन्नी आपल्या दोन उपमुख्यमंत्र्यांसह दिल्लीत आले होते. त्यांच्यासोबत प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धूही होते. चन्नी आणि अन्य नेत्यांनी गुरुवारी रात्री कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पंजाबच्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा, तसेच कोणाला कोणती खाती द्यायची याबाबत यावेळी प्रदीर्घ चर्चा करण्यात आल्याचे समजते.
मंत्रिमंडळात संतुलन राखण्याच्या दृष्टीने माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग गटाच्या काही नेत्यांनाही मंत्रिमंडळात सामावून घेण्यावर यावेळी एकमत झाले. राहुल गांधी यांनी प्रदीर्घ चर्चेनंतर मंत्रिमंडळाच्या यादीला हिरवी झेंडी दाखवली.
मंत्रिमंडळाच्या यादीला मंजुरी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री चन्नी आपल्या सहकार्यांसह चंडीगढला रवाना झाले. चन्नी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेऊन आपल्या मंत्रिमंडळाची यादी त्यांना सादर करणार आहेत. शनिवारी नव्या मंत्रिमंडळघचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
पंजाबमधील माझा, दोआबा आणि मालवा प्रांतातील चेहर्यांनाही मंत्रिमंडळात प्रांतीय संतुलन राखण्याच्या दृष्टीने स्थान मिळणार आहे. याशिवाय मंत्रिमंडळात बाच हिंदू तसेच चार दलित आमदारांनाही सामावून घेतले जाणार असल्याचे समजते.
सुनील जाखड यांची नाराजी दूर
प्रदेश कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. चन्नी यांना मुख्यमंत्री करण्याचा राहुल गांधी यांचा निर्णय धाडसी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नंतर व्यक्त केली. सुनील जाखड यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. चन्नी यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर जाखड नाराज झाल्याचे मानले जात होते. जाखड यांनी राहुल गांधी तसेच प्रियांका वढेरा यांची भेट घेतली होती. जाखड यांची नाराजी दूर करण्यात राहुल गांधी यशस्वी झाले. सिमल्याहून दिल्लीला परततांना राहुल गांधी यांनी जाखड यांना आपल्यासोबत विमानाने दिल्लीला आणले होते. चन्नी यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्याचा राहुल गांधी यांचा निर्णय धाडसी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.